शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा

By आनंद डेकाटे | Updated: July 29, 2023 15:39 IST

प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांची नाविण्यपूर्ण संकल्पना

नागपूर : राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला समृद्धी महामार्ग सध्या अपघातांमुळेच जास्त चर्चेत आहेत. येथील वाढत्या अपघातांमुळे लोकांमध्येही भिती पसरली आहे. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी शासनही प्रत्नशील असून विविध उपाययोजना करीत आहे. यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधक प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांनी एक नाविण्यपूर्ण संकल्पना मांडली असून यामुळे समृद्धी महामार्गवरील अपघात कमी होण्यास मदत मिळू शकेल.

समृद्धी महामार्गावरी अपघाताचे मुख्यतः दोन कारणे समोर येत आहे. एक तर वाहन चालकाचे संमोहन व दुसरे वाहनाचे टायर फुटणे. नुकत्याच व्हीएनआयटी विद्यार्थ्यांनी संमोहनचे कारण शोधून काढले. समृध्दी महामार्गाचा सरळ मार्ग, सिमेंटच्या रस्त्यावरुन शुभ्र पांढरा मार्ग वाहन चालकाचे मन विचलीत न करता वाहन चालविण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे, वाहन चालक स्वतःचे नियंत्रण विसरुन संमोहित होतो व वाहनावरचा ताबा विचलीत होतो व अपघात होतात.प्रियल चाैधरी व संजय ढोबळे यांच्या नविन संकल्पनेनुसार वाहन चालकाने आपले वाहन १५० किलोमीटर अंतर चालविल्यानंतर २० किमीने वाहनाची गती कमी करावी. त्यानंतर दर दोन किमीवर २० किमीने वाहनाची गती कमी-कमी करत जावी. याबाबतची माहिती देणारे स्पष्ट व सुंदर फलक रस्त्याच्या बाजुला लावावे. त्यामुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होईल. वाहन चालक संमोहित होणार नाही.

याप्रकारे वाहनाचा वेग ४० किमी पर तास इतका असेल तेव्हा महामार्गावर अर्धा किलोमीटर भागात पाणी साचून ठेवावे. ते वाहन अर्धा किलोमिटर पाण्यातून जाईल व वाहन चालकाला वेगळा अनुभव येईल व तो मुख्यतः संमोहन मुक्त होईल. वाहन चालकाच्या संमोहन मुक्तिसोबत वाहन पाण्यातून गेल्यामुळे वाहनाचे चाके थंडे होतील व चाकातील हवेचा दाब कमी होईल. पुढे १५० किलोमिटर पर्यंत ते टायर फुटण्यापासून वाचेल. यानंतर एका रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाधनगृह, छोटेसे उपहारगृह तयार करावे जेणे करुन वाहन चालकाला तिथे ५-१० मिनिटे थांबवून फ्रेश होता येईल. यानंतर वाहन चालकाने प्रत्येक २ किलोमिटरवर आपल्या वाहनाची गती २० किलोमिटरने वाढवत न्यावी. यामुळे अपघात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा