शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:33 IST

राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयात धडकल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम मिळाला आहे.

ठळक मुद्देआयोगाने घेतला कार्यक्रम मागे : उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयात धडकल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम मिळाला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वर्षभरापासून प्रलंबित आहे. निवडणुकीतील आरक्षणाविरोधात माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर अद्याप न्यायालयाने निकाल दिलेला नाही. तर प्रकाश डोमके यांची पारशिवनीसंबंधीची सर्वाच्च न्यायालयात दाखल याचिका नुकतीच निकाली निघाल्याने प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला. मात्र बाबा आष्टनकर यांच्या प्रलंबित याचिकेकडे प्रशासनाला विस्मरण झाले. यानंतर निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी अधिसूचना जारी करून निवडणूक प्रक्रिया जारी केली. मात्र बाबा आष्टनकर यांनी हायकोर्टात अवमानना याचिका दाखल करताच निवडणूक आयोगाने तातडीने सोमवारी अधिसूचना जारी करून निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याचे जाहीर केले. आष्टनकर यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर तीन-चारवेळा न्यायालयात सुनावणीसुद्धा झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मागितलेली अनेक कागदपत्रे शासनाजवळ नव्हती. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीदरम्यान शासनाला अनेकदा फटकारलेसुद्धा; शिवाय याचिका न्यायालयात प्रलंबित असून अद्याप निर्णय दिला नाही. मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे बाबा आष्टनकर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि व्यक्त केलेल्या भाकितानुसार प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की आली. काय आहे याचिकेतनिवडणुकीचे आरक्षण ५० टक्क्यावर जाऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, जि.प. निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात २०१६ मध्ये झालेल्या प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांना बगल देण्यात आली. हाच मुद्दा घेऊन माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय जि.प.ने आखलेल्या प्रभागा(गट)मध्ये जवळची गावे वगळून, दूरची गावे जोडण्यात आली आहते. तसेच तत्कालीन निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी २००७ मध्ये औरंगाबाद न्यायालयात आरक्षणासंदर्भात खोटी कागदपत्रे सादर केली होती. या सर्व प्रकरणांचा समावेश याचिकेत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक