शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सीताबर्डी मेन रोड हॉकर्सच्या ताब्यात

By admin | Updated: March 2, 2016 03:19 IST

सीताबर्डी बाजाराचा मुख्य सिमेंट रोड पूर्णपणे हॉकर्सच्या ताब्यात गेला आहे. सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा कर देऊन व्यवसाय करणारे व्यापारी यामुळे त्रस्त आहेत.

स्वत:च्याच नियमांकडे महापालिकेचे दुर्लक्ष : सीताबर्डी मर्चंट असोसिएशन नाराज नागपूर : सीताबर्डी बाजाराचा मुख्य सिमेंट रोड पूर्णपणे हॉकर्सच्या ताब्यात गेला आहे. सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा कर देऊन व्यवसाय करणारे व्यापारी यामुळे त्रस्त आहेत. कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांऐवजी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची हप्त्याची ‘देन’ भारी पडत आहे.सीताबर्डी मुख्य रस्त्यावर दररोज रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांची दुकाने थाटलेली दिसतात. हा रस्ता ‘वन वे’ असल्यामुळे लोखंडी पुलाकडून सीताबर्डीकडे एखादे वाहन येताना दिसले तर वाहतूक पोलीस लगेच कारवाई करतात. मात्र, रस्ता काबीज करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत नाही. या रस्त्याने दुचाकीही चालविणे कठीण होते. रविवारी तर या रस्त्यावर विक्रेत्यांची एवढी गर्दी असते की पायी चालणेही कठीण होते. येथे अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला महापालिकेने दुसरीकडे जागा देऊन स्थानांतरित करावे यासाठी सीताबर्डी मर्चंट असोसिएशन १९९४ पासून लढा देत आहे. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळतात. पण पुढे काहीच होत नाही, ही वास्तविकता आहे. हॉकर्सला राजकीय पाठबळ आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे विनाकारण वाद वाढू नये यामुळे येथील व्यापाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार घेतलेला नाही. मात्र, आपल्याला न्याय देण्यासाठी राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती दिसत नाही यामुळे ते आणखीनच नाराज आहेत. महापालिकेकडून न्याय मिळताना न दिसल्यामुळे सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत सीताबर्डी मुख्य रस्त्यावर अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला दुसरीकडे जागा देऊन स्थानांतरित करण्याचे आदेश महापालिकेला दिले. मात्र, त्यानंतरही महापालिकेने फक्त कागदोपत्री कारवाई करण्याचे सोंग केले. प्रत्यक्षात हॉकर्सचे स्थानांतरण केलेच नाही. त्यामुळे सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यामुळे महापालिकेने ९ मे २०१५ रोजी सूडबुद्धीने कारवाई करीत अतिक्रमणविरोधी कारवाईच्या नावावर सीताबर्डीतील दुकानांचे नामफलक तोडण्याची कारवाई केली. कारवाईस विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली, असा मर्चंट असोसिएशनचा आरोप आहे. महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ७२ /सी/१९४९ नुसार जे कर्मचारी योग्यरीत्या काम करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर सीताबर्डीतील अवैध हॉकर्सवर कारवाई न करणाऱ्या धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांवर आजवर कधीही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)मनपा म्हणते हॉकर्स झोनसाठी जागा निश्चितसीताबर्डी मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्ससाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. येथे १४१ हॉकर्सला स्थानांतरित करण्यात येणार आहे, असे शपथपत्र महापालिकेने न्यायालयात दिले आहे. ३ एप्रिल २००३ रोजी दिलेल्या दुसऱ्या एका शपथपत्रात महापालिकेने २३ हॉकिंग झोन तयार करण्यात आल्याचेही सांगितले होते. मात्र, हॉकर्सचे स्थानांतरण फक्त कागदोपत्रीच झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात हॉकर्स त्याच रस्त्यावर व्यवसाय करीत आहेत, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. या रस्त्यावर व्यवसाय करण्याकरिता जागा मिळविण्यासाठी माफिया काम करीत असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. वीज विक्रीचा गोरखधंदा सुरू सीताबर्डीच्या मुख्य रस्त्यावर रात्री मोठमोठ्या लाईटचा झगमगाट पहायला मिळतो. ही वीज शेजारच्या एखाद्या इमारतीच्या मीटरमधून अवैधपणे घेतली जाते. वीज देणारी व्यक्ती त्याबदल्यात हॉकर्सकडून पैसे घेते. या अवैध वीज विक्रीच्या विरोधात आजवर कारवाई झालेली नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. तर कशी होणार स्मार्ट सिटी ?सीताबर्डी हे नागपूरचे हृदयस्थान आहे. मात्र, या मुख्यस्थळी असलेल्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पहावयास मिळते. या रस्त्याने नागरिकांना दुचाकीही चालविणे कठीण होते. येथून हॉकर्सला हटविण्यात आले तर वाहतुकीची समस्या सुटेल. शहराच्या मुख्य भागातील हे चित्र बदलले नाही तर स्मार्ट सिटी कशी होणार, असा सवाल सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने केला आहे.