शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:13 IST

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत.

ठळक मुद्दे८० वर डॉक्टर, परिचारिकांचे घेतले नमुनेडॉक्टर, परिचारिकांना मास्क, शिल्ड, हॅण्डग्लोव्हजचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत. शनिवारी या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सर्व डॉक्टर, परिचारिकांना प्रत्येक रुग्ण कोविड संशयित समजूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रुग्ण तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची संख्या तीन ते चार हजाराच्या घरात होती. लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या ५०० वर आली. आता अनलॉक होताच रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सध्या हजार ते दीड हजार रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातच बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका कोविड हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत असल्याने नॉनकोविडमधील डॉक्टर व परिचारिकांवर रुग्णांचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व ८५ टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने कोणता रुग्ण पॉझिटिव्ह हे ओळखणे डॉक्टरांसाठीही कठीण झाले आहे. याचा फटका डॉक्टरांसह परिचारिकांना बसत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत मेडिकलच्या बालरोग विभाग, स्त्री रोग व प्रसूती विभाग, बधिरीकरण विभाग, त्वचारोग विभाग, जनरल सर्जरी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात तपासण्यात आलेला रुग्ण हा नंतर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. साधारण ४० वर डॉक्टरांसह ८० वर परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल येईपर्यंत या सर्वांना होम आयसोलेशन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी याला गंभीरतेने घेत प्रत्येक रुग्णाला कोविड संशयित रुग्ण म्हणूनच पाहण्याचे व मास्क, शिल्ड, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनचे नियम पाळून तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या