शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:36 IST

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्तास नागपुरात हा निर्णय लागू होणार नसल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

ठळक मुद्देलक्षणे नसलेल्यांना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या नव्या सूचना

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्तास नागपुरात हा निर्णय लागू होणार नसल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार, लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत केले जाते. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते.परंतु आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा (होम आयसोलेशन) पर्याय उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाच्या सूचना आहेत. यासाठी संबंधित डॉक्टरला रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे. होम आयसोलेशनमध्ये योग्य सोईसुविधा उपलब्ध असायला हव्यात, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असायला असावी, घरी काळजी घेणाऱ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा देण्यात यावी.अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन करण्याचा शासनाच्या नव्या सूचना आहेत. परंतु नागपुरात सध्याच्या स्थितीत रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा पाहता यावर पुढे निर्णय घेता येईल. तूर्तास पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर रुग्णालयातच उपचार होतील.-रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस