शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह आले, उपचार केला, बरे झाले आणि पुन्हा कामावर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:29 IST

कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी ही बातमी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेतच परंतु ते आता आपल्या कामावरही परत येऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर वीज विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी वेळेवर तपासणी करून घेतली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊन पूर्वीप्रमाणेच आपल्या कामाची जबाबदारीही सांभाळण्यास सज्ज झाले आहेत.

ठळक मुद्दे कोविड-१९ वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी बाब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी ही बातमी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेतच परंतु ते आता आपल्या कामावरही परत येऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर वीज विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी वेळेवर तपासणी करून घेतली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊन पूर्वीप्रमाणेच आपल्या कामाची जबाबदारीही सांभाळण्यास सज्ज झाले आहेत.गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कोविड-१९ चे ५७७३ अ‍ॅक्टीव्ह केसेस होते. यात ५५१६ आता बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांमध्ये अनेक सरकारी कर्मचारीही आहेत. तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. ते आता पूर्णपणे बरे होऊन कामावर परत आले आहेत. कोविड -१९ प्रभावित ३० टक्के पोलीस कर्मचारीही आता कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास सज्ज झाले आहेत. कोरोनावर मात करून आपापल्या कामावर परत आलेल्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी महावितरणचे आहेत. कंपनीत आतापर्यंत एकूण ३१ कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत. यापैकी २० कर्मचारी चक्रीवादळ्यादरम्यान झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीच्या कामासाठी रायगडला गेले होते, ते आहेत. तेथून परत येताच त्यांची टेस्ट करण्यात आली होती. यापैकी १८ कर्मचारी आता बरे झाले असून १७ कर्मचारी कामावर परत आले आहेत. केवळ एक कर्मचारी अजूनपर्यंत कामावर परतलेला नाही. कारण तो ज्या भागात राहतो तो भाग सील करण्यात आलेला आहे. र्वरित १४ कर्मचारी अलीकडेच पॉझिटिव्ह आले. कामावर परत आलेले सर्व कर्मचारी पूर्वीप्रमाणेच आपली जबाबदारी पार पाडत आहेत.निगेटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईनबरे झालेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयाला याची सूचना दिली. कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ते पुन्हा कामावर परत आले आहेत.लाईनमनने केली कोरोनावर मातमहावितरणच्या काँग्रेसनगर डिव्हीजनमधील एक लाईनमननेही कोविड १९ ला मात दिली आहे. श्रीकृष्णनगर येथील रहिवासी असलेला हा लाईनमन आता पूर्वीप्रमाणेच धंतोलीत आपले काम करीत आहे. वीज गेल्याची तक्रार येताच ते दुरुस्ती करायला निघतात. पूर्वीप्रमाणेच खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतात. कोकणात गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ते एक आहेत. तिथेच त्यांना संसर्ग झाला होता. सध्या ते पूर्वीप्रमाणेच आपले काम करीत आहेत. त्यांचे सहकारीही त्यांना दुरुस्तीच्या कामात पूर्ण सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर