शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 01:11 IST

गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसंशयित रुग्णांची तपासणी होणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकावर दररोज २२०० बसेस ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्या २५ हजाराच्या जवळपास राहते. कोरोनामुळे नागपुरात खळबळ उडालेली असताना ‘लोकमत’ने गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या, याचा आढावा घेतला. परंतु कोरोनाबाबत बसस्थानकावर प्रवाशांमध्ये जागृतीही करण्यात येत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करीत असताना बसस्थानकावर काहीच उपाययोजना न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे, प्रवाशांनी काय काळजी घ्यावी, याबाबत प्रवाशांना सूचना देणे गरजेचे आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या प्रशासनाने याबाबत काहीच उपाययोजना केली नसल्याचे दिसले. एसटी प्रशासनाने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रवाशांना योग्य त्या सूचना देण्याची आणि बसस्थानकावर संशयित प्रवाशांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.खबरदारी घेण्याच्या मुख्यालयाच्या सूचना‘प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांना खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई मुख्यालयाने केल्या आहेत. याशिवाय प्रवाशांमध्येही जागृती करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहे. बसस्थानकावर कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय १७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

 

टॅग्स :corona virusकोरोनाstate transportएसटीpassengerप्रवासी