शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७ शहरे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:16 IST

महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.

ठळक मुद्देआराखडा होतोय तयार : मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.पर्यावरण मंत्री यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या लेखी उत्तरात ‘हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी महराष्ट्र राज्यातील १७ प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले आहे. सदस्य भीमराव तापकीर, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.नागपूर विद्यापीठात १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं : विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ग्रंथालयात तब्बल १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं असल्याची बाब कॅगच्या अहवालात नमूद असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.सदस्य सुधाकर देशमुख आणि डॉ. मिलिंद माने यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठातील ग्रंथालयात असलेल्या कोट्यवधी पुस्तकांची पडताळणी गेल्या अनेक वर्षांपासून झाली नसल्याची बाब कॅगच्या अहवालात आली असल्याची बाब त्यांनी प्रश्नाद्वारे निदर्शनास आणून दिली. यावर आपल्या लेखी उत्तरात विनोद तावडे यांनी सांगितले की, २०१६-१७ च्या कॅगच्या अहवालामध्ये सन १९९४ पासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी झाली नसल्याचे नमूद केले आहे. तथापि विद्यापीठ परिसरातील ज्ञानस्रोत केंद्रातील ग्रंथ पडताळणी सन २००० मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच यावर्षी शैक्षणिक विभागातील १५ ग्रंथालयांतील ग्रंथ पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. कॅगच्या अहवालात विद्यापीठ ग्रंथालयाच्या स्थितीबाबत काहीही भाष्य करण्यात आले नाही. तथापि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी करणे शक्य झाले नसल्याचे ग्रंथपालांनी कॅगला दिलेल्या उत्तरात नमूद असल्याची बाब कबूल केली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८pollutionप्रदूषण