नागपूर : नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर हुकुमशाहीकडे वाटचाल असते, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिला असून ही गोष्ट पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी येथे केले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सामाजिक सामाजिक व आर्थिक समता संघाने तयार केलेल्या महाराष्ट्रातील गरीबी, असमानता व भेदभाव, अस्पृष्यता आणि अत्याचारांवरील अहवाल प्रकाशनाचे आणि परिषदेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता संघाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. र्हदीप कांबळे, डॉ. पी.जी. जोगदंड, डॉ. के.एम. कासारे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ घटना परिषदेमध्ये ऐतिहासिक असे भाषण केले होते या भाषणात त्यांनी भारतीय राज्य घटना, संविधान निर्मिती प्रक्रियेचा सारांश, साध्य करायची स्पष्ट लक्ष्ये, लाभ आणि तृटी सुद्धा भारतीय नागरिक व नगरिकांच्या भविष्यकालीन पिढ्यांना सांगितल्या होत्या. देशात लोकशाही योग्य रुपात आणि वास्तवात राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना तीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात व्यक्तिच्या व संस्थेच्या स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाऊ नये. व्यक्तीपूजा ही अंध:पतनाकडे नेते. त्यातून हकुमशाही निर्माण होते. दुसरी आपले सामाजिक आणि आर्थिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लवकरात लवकर घटनात्मक पद्धती स्वीकारून घटनाबाह्य पद्धतीचा त्याग करणे, आणि फक्त राजकीय लोकशाहीचा विचार करून चालत नाही. कारण ती सामाजिक लोकशाहीच्या मजबूत पायावरच आधारित असते. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीची व्याख्या करताना स्पष्ट म्हटले आहे की, अशी जीवन पद्धती की जिच्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनतत्तवे, इतकी परावलंबित्व की ज्यात तीन लोकांचा गट ही विभक्त होणार नाही.
राजकारणात व्यक्तिपूजा म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल - हमीद अंसारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 18:42 IST