शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेतील राजकारण : गृहमंत्र्यांचे पुत्र काँग्रेसवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 21:20 IST

उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली.

ठळक मुद्देएककल्ली कार्यक्रम खपवून घेणार नसल्याची सलील देशमुखांची भूमिकागरज पडल्यास बोढारेंनाही करणार विरोध

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांचा एककल्ली कार्यक्रम खपवून घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. वेळ पडल्यास राष्ट्रवादीच्या सदस्य, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे यांनाही विरोध करू असे सांगून अप्रत्यक्षरीत्या बोढारेंवरील रोषही व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते पदांच्या वाटपापर्यंत अशा सर्वच ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली. बोढारे यांना सभापतिपद मिळाले असले तरीसुद्धा त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून आले आहे. आज राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ सदस्य शेखर कोल्हे म्हणाले, आम्ही आतापर्यंत आघाडी धर्म पाळला. मात्र आता आम्ही जनतेची बाजू मांडणार आहोत. आम्ही सत्तेत आहोत मात्र जिल्हा परिषदेचा कारभार एककल्ली होऊ देणार नाही. चुका झाल्यास आम्ही विरोध करणार, जनतेची बाजू मांडणार. गरज पडल्यास महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीविरुद्ध सुद्धा भूमिका घेऊ. यावेळी सलील देशमुख म्हणाले की, आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. जनतेशी आम्ही प्रामाणिक आहोत. त्यामुळे गरज पडल्यास जनतेसाठी आम्ही सभागृहात विरोधी भूमिका घेऊ. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश बंग, शेकापचे सदस्य समीर उमप व इतर सदस्य उपस्थित होते.स्वीकृत सदस्य असावेतजिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य असावेत, यासाठी राष्ट्रवादीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य होते. नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य असावेत, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी पक्षातर्फे आमसभेत प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती यावेळी सलील देशमुख यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरPoliticsराजकारणSalil Deshmukhसलिल देशमुख