शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुजाता आनंदन् यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन् लिखित ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.नागपूर प्रेस क्लबला झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना खा.आनंद अडसूळ, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. आशिष देशमुख, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचे असो, विदर्भाला हवा तो न्याय मिळाला नाही. इच्छाशक्तीचीदेखील कमतरता होती. मात्र याचा अर्थ विदर्भाचा विकास न होताच त्याला वेगळे करणे असा होत नाही. जर अविकसित राज्य निर्माण झाले तर पुढील पिढ्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल. विशेष म्हणजे जनतेचे खरोखर याला समर्थन आहे का हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विदर्भावर सातत्याने अन्यायच झाला. या मुद्यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करणारे चर्चेपासून दूर पळतात. विदर्भ राज्य निर्माण झाले तर हा भाग सक्षम होईल, असे श्रीनिवास खांदेवाले म्हणाले. यावेळी लेखिका सुजाता आनंदन् यांनी पुस्तकातील मुद्यांवर भाष्य केले. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. सरिता कौशिक यांनी संचालन केले.विदर्भातील आमदारांनी दिल्लीला विचारावेवेगळ्या विदर्भासंदर्भात प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिले होते. मात्र त्या आश्वासनाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांनी दिल्लीत चलावे व तेथे वरिष्ठ नेत्यांना विचारणा करावी, असे प्रतिपादन आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भJournalistपत्रकार