शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पॉलिटिकल वॉर; केदारांनी खुर्चीतून उठवल्याने देशमुख रुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 12:09 IST

Nagpur News क्रीडामंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्धाला गेल्या काही वर्षांत विराम लागला होता. मात्र, एका खुर्चीवरून पुन्हा एकदा या संघर्षात ठिणगी पडली आहे.

ठळक मुद्देशनिवारच्या अपमानाचा रविवारी पत्र काढून वचपा पालकमंत्री राऊत यांचीही घेतली भेट

 

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : क्रीडामंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्धाला गेल्या काही वर्षांत विराम लागला होता. मात्र, एका खुर्चीवरून पुन्हा एकदा या संघर्षात ठिणगी पडली आहे. काटोलच्या आढावा बैठकीत शेजारच्या खुर्चीत बसलेल्या देशमुखांना केदारांनी सर्वांसमक्ष उठवले. खुर्चीसाठी झालेल्या अपमानातून देशमुख रुसले आणि दुसऱ्याच दिवशी घोटाळेबाज केदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारा लेटरबॉम्ब त्यांनी टाकला. खुर्चीच्या या किस्स्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा रंगली आहे. (Deshmukh was shocked when Kedar got up from his chair)

आशिष देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा पुन्हा एकदा काटोल मतदारसंघाकडे वळविला आहे. शनिवार, २१ जुलै रोजी पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी काटोल व नरखेड येथे विविध विकासकामांच्या आढावा बैठका घेतल्या. या बैठकांना जिल्हा परिषदेचे पदाधकारी, अधिकारी, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सरपंच यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता काटोल तहसील कार्यालयात आयोजित बैठकीसाठी केदार यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख पोहचले व मंचावर केदार यांच्या बाजूच्या खुर्चीत बसले. ती खुर्ची जि.प. अध्यक्षांसाठी राखीव होती. याशिवाय दोन खुर्च्या जि.प. सभापतींसाठी राखीव होत्या.

केदार यांनी देशमुख यांना लगेच टोकले. ही जिल्हा परिषद व सरपंचांची आढावा सभा आहे. त्यामुळे येथे संबंधित पदाधिकारी बसतील, असे सांगितले. हे ऐकूण देशमुख खुर्चीवरून उठले व शेवटून दुसऱ्या खुर्चीत जाऊन बसले. पुढे त्यांना बैठकीत बोलण्याचीही संधी मिळाली नाही. सरपंचांसमोर आपला अपमान झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होते. बैठकीतही याची कुजबुज सुरू झाली होती. शेवटी तासभर बसून देशमुख निघून गेले. यानंतर दुपारी ३.३० वाजता देशमुख नरखेडच्या बैठकीत पोहचले. येथे मात्र ते मंचावर न जाता समोर सरपंचांमध्ये जाऊन बसले. येथेही त्यांना मंचावर खुर्ची मिळाली नाही. या घटनाक्रमामुळे देशमुख कमालीचे दुखावले.

केदारांचा काटोल विधानसभेच्या दौराही खटकला

- काटोल- नरखेडच्या आढावा बैठकीनंतर केदार यांनी रात्री पावणेदोन वाजेपर्यंत काटोल मतदारसंघातील सुमारे डझनभर गावांचा दौरा केला. या दौऱ्यात केदारांसोबत पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. मात्र, आशिष देशमुख याही दौऱ्यात नव्हते. केदार यांचा हा दौराही देशमुख यांना चांगलाच खटकला व त्यांच्या रोषात आणखीणच भर पडली, असे देशमुख यांच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले.

देशमुख दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांच्या भेटीला

- शनिवारच्या घटनाक्रमानंतर रविवारी सकाळी देशमुख यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या बेझनबाग येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. दुपारनंतर लागलीच देशमुख यांनी जिल्हा बँक घोटाळ्यावरून केदार यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. देशमुख-राऊत यांची ही भेट पूर्वनियोजित होती की आकस्मिक, या भेटीत देशमुख यांनी केदारांकडून मिळालेल्या वागणुकीची तक्रार केली का, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केदार-राऊत यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष पाहता देशमुखांना राऊत यांचे तर पाठबळ नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारAshish Deshmukhआशीष देशमुख