शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा, भोयर यांच्याऐवजी अपक्ष देशमुख यांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 22:32 IST

Nagpur News मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देमतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारच बदललाकेदारांच्या हट्टापुढे पक्षश्रेष्ठी शरणबावनकुळेंसाठी पुनर्वसनाची लढाई

 

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिटिकल ड्रामाचा पडदा उघडला. काँग्रेसने भाजपमधून आयात केलेले नगरसेवक रविंद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले.

विशेष म्हणजे रविंद्र भोयर यांनी लढण्यासाठी असमर्थता व्यक्त केल्याचे कारण प्रदेश काँग्रेसकडून जारी केलेल्या पत्रात देण्यात आले. छोटू भोयर यांनी मात्र आपण असमर्थता व्यक्त केली नसल्याचे स्पष्ट करीत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने माजी ऊर्जा मंत्री व प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांना रिंगणात उतरविले आहे. हायकमांडच्या नाराजीतून ऐनवेळी कामठी विधानसभेत तिकीट कटल्यानंतर ही निवडणूक त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी महत्वाची मानली जात आहे. एकूण ५५९ मतदार असलेल्या या निवडणुकीत भाजपकडे ३२५ हून अधिक हक्काची मते असल्याने पारडे जड आहे.

बावनकुळे यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने संघपरिवारात वावर असलेले भाजपचे नगरसेवक रवींद्र भोयर यांना आयात करीत उमेदवारी दिली होती. भोयर हे पॉवरफूल असून त्यांना भाजपच्या असंतुष्ट मतदारांचा पाठिंबा मिळेल व ते चमत्कार करतील, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. मात्र, सातच दिवसात काँग्रेस नेत्यांना भोयर यांची ‘पॉवर’ कळाली. भोयर हे मतदारांना ‘खूश’ करण्यात, संपर्कात कमी पडले. यामुळे क्रीडा मंत्री सुनील केदार संतापले. त्यांनी भोयर यांची उमेदवारीच बदलावी, अशी टोकाची भूमिका घेतली. पालकमंत्री नितीन राऊत यांनी या भूमिकेला समर्थन दिले. केदार यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेत सर्व काँग्रेस नेत्यांशी बैठका घेतल्या व भोयर यांना बदलून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना अधिकृत पाठिंबा देण्याचा प्रस्ताव नेत्यांच्या संमतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविला. बुधवारी हा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा.काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आला. केदार यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही विषय पटवून दिला. शेवटी मतदानाला काही तास उरले असताना, गुरुवारी सायंकाळी ७ वाजता अ.भा. काँग्रेस समितीच्या संमतीने प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीने पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करण्यात आले.

बसपाचे नगरसेवक पालकमंत्री राऊतांना भेटले

- या निवडणुकीत बसपाचे १२ नगरसेवक मतदार आहेत. प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी बसपाचे नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहणार असून कुणालाही मतदान करणार नाहीत, असे सोमवारी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास बसपाच्या पाच नगरसेवकांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची रविभवन येथे भेट घेतली. या भेटीत आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करू, अशी हमी दिल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

असमर्थता दर्शविली नव्हती

- मी काँग्रेस सोबतच आहे. भाजपशी संबंध तोडले आहेत. काँग्रेसने उमेदवारी दिल्यावर प्रचार सुरू केला होता. मी कुठल्याही प्रकारे निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शविली नव्हती. मी केवळ उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये आलो नाही. काँग्रेस पक्षाचा निर्णय मला मान्य आहे.

- रवींद्र भोयर, उमेदवार

 

- एकूण ५५९ मतदार मतदान करतील.

- नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र व ग्रामीण भागातील १२ अशा एकूण १५ केंद्रांवर मतदान होईल.

- सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान करता येईल.

टॅग्स :Electionनिवडणूक