शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

काटोलमध्ये राजकीय खळबळ ;चरणसिंग ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 14:41 IST

जुन्या प्रकरणात काटोल नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना ठरावावर सहमती दर्शविणे विद्यमान सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह नगरसेवक किशोर गाढवे यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणात नगर विकास विभागाने दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्यास १५ दिवसांचा अवधी

आॅनलाईन लोकमतनागपूर : जुन्या प्रकरणात काटोल नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना ठरावावर सहमती दर्शविणे विद्यमान सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह नगरसेवक किशोर गाढवे यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणात नगर विकास विभागाने दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे काटोलच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे याच प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते.नगर विकास मंत्रालयाने गुरुवारी (दि. २३) ही नोटीस बजावली आहे. तक्रारदार राहुल देशमुख यांनी २० जून २०१७ रोजी नगर विकास विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ही नोटीस बजावली आहे. काटोल नगर परिषदेची ९ आॅक्टोबर २०१२ रोजी सर्वसाधारण सभा होती. त्यात ठराव क्र. ८ मध्ये शिंपी चाळीतील दुकान संकुलाचे गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार लागणारा खर्च हा प्रत्येक गाळेधारकाकडून टप्प्या-टप्प्याने घेण्याचे ठरविले होते. त्यानंतर हीच रक्कम गाळा देताना ना परतावा म्हणून अधिमूल्य रक्कम म्हणून गृहित धरून समिती ठरवेल एवढे भाडे आकारून ३० वर्षांसाठी लीजवर देणे हा विषय होता. सभेत या ठरावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे गाळे आवंटनात महाराष्टÑ नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ९२ (१), ९२ (३) या तरतुदीचा भंग झालेला असल्याचे म्हटले आहे.यासोबतच १ जानेवारी २०१३ च्या सर्वसाधारण बैठकीतील ठराव क्र. २६ वर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. यात भूखंड क्र. ३६७/१ व २ क्षेत्रफळ २८०० चौ.फूट जागा ही गोरक्षण संस्थेला १ एप्रिल १९३५ मध्ये नगर परिषदेने लीजवर दिली होती. परंतु गोरक्षण संस्थेला भाडेकरू ठेवण्याचा अधिकार दिलेला नसताना त्यांनी भाडेकरू ठेवले होते. त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी महाराष्टÑ नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाचा भंग झाला.या दोन्ही प्रकरणात अभिलेख तपासला असता विद्यमान सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर आणि नगरसेवक किशोर गाढवे यांनी स्वाक्षरी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

टॅग्स :Politicsराजकारण