शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:18 IST

नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. ही घोषणा होताच जिल्ह्यात आता राजकीय आखाडा रंगणार आहे.

ठळक मुद्दे३८१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर : २६ सप्टेंबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. ही घोषणा होताच जिल्ह्यात आता राजकीय आखाडा रंगणार आहे.नागपूर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ३८१ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच थेट सरपंचही निवडल्या जाणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्याची भर पडणार आहे. यासोबतच रामटेक तालुक्यातील एका ग्राम पंचायतीतील रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक याच दिवशी होईल.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ ते ११ सप्टेंबर २०१८ या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी १२ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्यातालुका   ग्रामपंचायतीहिंगणा : ४१पारशिवनी : १९सावनेर : २७काटोल : ५३भिवापूर : ३६नागपूर ग्रामीण : १९कळमेश्वर : २२कामठी : ११मौदा : ३१रामटेक : २८कुही : २२उमरेड : २६नरखेड : ३०------------एकूण : ३८१आचारसंहिता फक्त ग्रामपंचायतीपुरतीचजिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (गुरुवारी) जाहीर झाला आहे. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु आचारसंहिता ही केवळ ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. त्यांच्यापुरतीच मर्यादित राहील. अश्विन मुदगल,जिल्हाधिकारी, नागपूर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक