शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:52 IST

मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देमहिला धम्म मेळाव्यात नवीन शिक्षण धोरणावर चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कोणत्याही काळात महत्त्वाचे असते कारण शिक्षणामुळेच माणसात निर्भयता व स्वतंत्रवृत्ती निर्माण होते. मात्र शासनाने आणलेले नवीन शिक्षण धोरण हे विपरीत आहे. मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि महिला संघटनेच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित महिला धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी वक्ता म्हणून वंदना वनकर तसेच डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुषमा भड, छाया खोब्रागडे, वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी मूल्य ही तथागत बुद्धाच्या केंद्रस्थानी होते. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाला अनुरूप मानवी मूल्य रुजविणे गरजेचे आहे. मात्र नवे शिक्षण धोरण धार्मिक मूल्य रुजविणारे आहे, ज्यात धर्मनिरपेक्षतेला पायदळी तुडविले जात आहे. हिंदू धर्म व संस्कृतीला अनुकूल करून धर्माची मानसिक गुलामी विद्यार्थीदशेपासून लादली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.वंदना वनकर यांनी नव्या शिक्षण धोरणातील अनेक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. हे धोरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त व गरिबांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी शाळा बंद करून शिक्षणात खासगीकरणाला चालना देण्यात येत आहे. पारंपरिक सण, संस्कृतीचा आदर्श जोपासण्याच्या नावावर वर्णव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जात आहे. पुरातन काळातील गुरुकुल पद्धती आदर्श असण्याचा उल्लेख करून शिक्षणातून जातीभेदाचा पुरस्कार करण्यात येत आहे. पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेला बळकट करून स्त्रियांची गुलामगिरी अधिक घट्ट करण्यात येत असल्याचा आरोप करीत हे धोरण म्हणजे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा व गुलामगिरीचा जाहीरनामाच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.छाया खोब्रागडे यांनी धोरणातील भाषिक तरतुदींवर विचार मांडले तर डॉ. सरोज आगलावे यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाच्या प्रयत्नाकडे लक्ष वेधले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन शामला वाघधरे यांनी तर संघमित्रा नगरकर यांनी आभार मानले. सविता कांबळे, सुजाता लोखंडे, मायाताई थोरात आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला