शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिसांमागे धावत होते पोलीस ! कायदा तोडणाऱ्या ५५ पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:52 IST

कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई करण्यात आली .

ठळक मुद्देनागपूर शहर  वाहतूक शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. होय, सोमवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी कायदा तोडणाऱ्या थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई केली. या कारवाईत केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे तर काही अधिकारीही अडकले.वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कुणाचीही गैरसोय होऊ नये आणि अपघात घडू नये म्हणून वाहतुकीचे नियम, कायदे बनविण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीस चालान कारवाई करतात. पोलीस नागरिकांवर कारवाई करतात मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कधीच कारवाई करीत नाही, अशी सर्वसामान्य वाहनचालकांची ओरड असते. वाहतूक पोलिसांवर पक्षपाताचाही आरोप होतो. अनेकदा तक्रारीही होतात. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी हा आरोप टाळण्यासाठी ‘कायदा सर्वांसाठी समान’ याची प्रचिती देणारी मोहीम सोमवारी शहरात राबविली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा सर्वसामान्य माणूस असो, पोलीस कर्मचारी असो की अधिकारी अशा सर्वांवरच कारवाईचा धडाका लावण्यात आला. त्यात चक्क ५५ पोलीस अडकले. या सर्वांवर चालान कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. कारवाईत अडकलेल्यांमध्ये गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या वाहन चालकांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही विशेष मोहीम राबविली.कारवाईचे स्वरूपविना हेल्मेट : ४३सीटबेल्ट न लावणारे : १२विविध वाहनांचे एकूण दोषी चालक : ५५आपली जबाबदारी जास्त : डॉ. उपाध्यायकायदा मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आम्हा पोलिसांना आहे. त्यामुळे कायद्याचे सक्तीने पालन करण्याची जबाबदारी आमची सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचे कसोशीने पालन केलेच पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस