शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरातील  हुक्का पार्लरचे परवाने रद्द करण्याची पोलिसांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:06 IST

दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देदोन वर्षात ३० पेक्षा जास्त हुक्का पार्लरवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.पोलीस महासंचालक कार्यालयातून हुक्का पार्लर संबंधाने एक आदेशपत्रक राज्यातील सर्व ठिकाणच्या पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मिळाले. त्यात हुक्का पार्लरवरील कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, हुक्का पार्लर ज्या इमारतीत सुरू आहे, त्या ठिकाणी कोणती आणि कशी कारवाई करावी, त्यासंबंधाची सूचना आहे. कारवाईनंतर ज्या विभागांनी हुक्का पार्लरच्या इमारतींना परवाने (इटिंग लायसेन्स, गुमास्ता आदी) दिले. त्यांच्याकडे कारवाईचा अहवाल पाठवून तो परवाना रद्द करण्यासंबंधीचा पाठपुरावा करण्यासंबंधीच्या सूचना आहेत. त्याचा आधार घेत विविध विभागांसोबत पोलीस समन्वय करून हुक्का पार्लर बंद करण्याबाबत पावले उचलले जाणार आहेत. अल्पवयीन मुलांना प्रवेश देऊन हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या, गेल्या दोन वर्षात ३० पेक्षा जास्त हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेतर्फे कारवाई करण्यात आली आहे, हे विशेष !

टॅग्स :Smokingधूम्रपानnagpurनागपूर