शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यासोबत पोलिसांची पार्टी; 'असा' उघडकीस आला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 13:19 IST

याप्रकरणी एका अधिकाऱ्याची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या कारवाईने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देसंबंधित अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदली : पोलीस आयुक्तांनी फटकारले

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीने गुन्हे शाखेच्या युनिट-२ कार्यालयात दारू-कबाब पार्टी साजरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या सतर्कतेने ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्याची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या कारवाईने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गुन्हे शाखेने रॅकेटचा या पर्दाफाश करून यात सहभागी असलेल्या चार आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. हे आरोपी तुरुंगात आहेत. पार्टीची घटना गेल्या आठवड्यात घडली. सेमिनरी हिल्स येथील गुन्हे शाखेचे युनिट-२ या प्रकरणाचा तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अधिकारी आणि जवानांसोबत पार्टी आयोजित केली होती. आरोपीच्या हितचिंतकांनी पार्टीसाठी सामानाची व्यवस्था केली. संध्याकाळनंतर आरोपी, त्याचे साथीदार आणि युनिट २ मधील काही कर्मचाऱ्यांनी पार्टी साजरी केल्याचे सांगण्यात येते. रात्री. बाहेरील लोकांची हालचाल नसल्याने पार्टीबाबत कोणालाच माहिती मिळू शकली नाही. कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची खात्री युनिट-२ चे अधिकारी कर्मचारीदेखील निश्चिंत होते.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना या पार्टीची माहिती मिळाली. त्यांनी युनिट-२ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. नियंत्रण कक्षात पाठवलेल्या अधिकाऱ्याला विनाकारण शिक्षा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ज्याच्या संमतीने हा कारभार झाला त्या अधिकाऱ्यावरदेखील कठोर कारवाई अपेक्षित होती.  न्यायालयाची फसवणूक करून गुन्हेगारांना मदत करणाऱ्या आरोपींना चांगल्या कोठडीची 'सुविधा आणि पार्टीची परवानगी देणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. दोषींवर कठोर कारवाई करूनच योग्य संदेश दिला जाऊ शकतो.

मटका किंगने केला अधिकाऱ्याचा सत्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटाळा येथील कुख्यात मटका किंग भल्ला याने दोन महिन्यांपूर्वी परिसरात सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात युनिट-२ च्या अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला होता व भल्लाने सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयnagpurनागपूर