शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात साध्या वेशात उभे राहणार पोलीस; सिग्नल तोडणाऱ्यांवर होईल कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 11:18 IST

सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टीम्स सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.या पथकातील वाहतूक शाखेचे पोलीस साध्या वेशात शहरातील विविध सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहणार आहेत. कोणत्याही दिशेने वाहन चालकाने सिग्नल तोडून पळण्याचा प्रयत्न केला तर समोर उभे असलेले हे साध्या वेशातील वाहतूक पोलीस त्याला अडवतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. एवढे करून वाहनचालकांने पोलिसांना चुकविले तर प्रत्येक सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून वाहनचालकाचा पत्ता शोधून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.सिग्नल जम्पिंगमुळे अनेकदा दोष नसलेल्या वाहनचालकांना किंवा पायी जाणाऱ्यांना अपघात होतो. अपघात घडविणारा पळून जातो किंवा त्यालाही अनेकदा गंभीर दुखापत होते किंवा कुणाचा जीवही जातो. अपघातामुळे संबंधितांच्या कुुटुंबीयांची न भरून निघणारी हानी होते. अनेकांना अपंगत्व येते.सिग्नल हा काही सेकंदच बंद असतो. तरीदेखिल बेशिस्त वाहनचालक काही क्षणांसाठी स्वत:चा आणि दुसºयाचा जीव धोक्यात घालतात. असे होऊ नये, नागपूर शहर अपघातमुक्त शहर व्हावे आणि प्रत्येकालाच वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त लागावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम आखली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.आज पहिल्याच दिवशी या पथकांनी सिग्नल तोडणाऱ्या १६२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. सिग्नल जम्पिंगचे प्रमाणे शून्य करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे वाहतूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांची मदतपोलिसांना चकमा देऊन पळून गेलेल्यांच्या घरी जाऊन संबंधित वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. कुणी वाहनचालक वारंवार हा गुन्हा करत असेल तर त्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) पाठविला जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस