शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

हिस्सेवाटणीतूनच पोलिसांची फ्री स्टाईल

By admin | Updated: May 20, 2014 01:12 IST

दोन लाखाच्या हिस्सेवाटणीमुळे मतभेद झाल्यानेच कळमना पोलीस ठाण्यातील दोघांनी एकमेकांना बदडून काढल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणामुळे शहर पोलीस दलाच्या

दोन लाखाच्या वसुलीचा वाद

नागपूर : दोन लाखाच्या हिस्सेवाटणीमुळे मतभेद झाल्यानेच कळमना पोलीस ठाण्यातील दोघांनी एकमेकांना बदडून काढल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणामुळे शहर पोलीस दलाच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलीस दलातही त्या अनुषंगाने ‘छी, थू ‘ होत आहे. बहुचर्चित अनंता सोनी हत्याकांडातील मृत सोनीच्या पत्नीचा भूखंड आरोपी बिल्डर रामलाल कटरेने हडपण्याचे प्रयत्न केले. त्याची तक्रार काही दिवसांपूर्वी सोनीच्या पत्नीने कळमना ठाण्यात केली. बिल्डर कटरेवर गंभीर कारवाई होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यातील नागोराव तुळशीराम इंगळे (वय ५१) आणि मेघनाथ विश्वनाथ तरडे (वय ३७) या दोघांनी महत्त्वाची भूमिका वठविली. त्याबदल्यात प्रारंभी इंगळेने ५० हजार आणि त्यानंतर तरडेने दीड लाख रुपये कटरेकडून घेतल्याची चर्चा पसरली. त्यामुळे तरडेने कटरेकडून घेतलेल्या दीड लाखातील ५० हजारांची इंगळेने मागणी केली. तरडेने नकार दिल्यामुळे या दोघांत तीन दिवसांपुर्वी जोरदार वाद झाला. प्रकरण चिघळतच गेले. एकमेकांना शिवीगाळ आणि धमक्याही झाल्या. त्याने मन भरले नसल्याने इंगळे पत्नी आणि मुलांसह कळमना ठाण्यात पोहोचला. तो वाहनातून खाली उतरताच तरडेने त्याच्यावर हल्ला चढवला. इंगळे मार खात असल्याचे पाहून त्याच्या मुलांनी आणि पत्नीने चपलेसह हातात येईल त्या साधनाने इंगळेला बदडले. तब्बल १० मिनिटे पोलीस ठाण्याच्या आवारात ही हाणामारी सुरू होती, अन् कुणीच मानायला तयार नव्हते. दोघांच्याही तक्रारी खोट्या त्यांना कसेबसे आवरल्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी देऊन, गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला. एकाची विनयभंगाची तर दुसर्‍याची जबरीचोरीची तक्रार होती. या दोन्ही तक्रारी खोट्या असल्याने त्यांना समजावण्याचे त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयत्न केले. ते ऐकत नसल्याने आणि प्रकरण चिघळत असल्याचे पाहून वरिष्ठांना कळविण्यात आले. त्यामुळे साप्ताहिक रजेवर असलेले ठाणेदार सत्यजित बंडीवार आणि एसीपी कुमरे लगबगीने ठाण्यात पोहोचले. त्यांनी या दोघांनाही फैलावर घेतले. प्रकरण उपायुक्त, सहआयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या कानावर गेले. त्यांनी ते गांभीर्याने घेत आज सकाळीच संबंधितांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. या दोघांवर निलंबनाची कारवाई करावी की बडतर्फीची, त्याबाबत दिवसभर विचारविमर्श सुरू होता. वृत्त लिहिस्तोवर कारवाईचे स्वरूप स्पष्ट झालेले नव्हते.