शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वर्धमाननगरात पोलीसांचा ‘फ्लॅग मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:45 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी लकडगंज पोलीसांनी वर्धमाननगरात ‘फ्लॅग मार्च’ करत सोशल डिस्टेन्सिंगबाबत जनजागृती केली.

ठळक मुद्देपुष्पवर्षाव आणि टाळ्यांच्या गजराने झाले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी लकडगंज पोलीसांनी वर्धमाननगरात ‘फ्लॅग मार्च’ करत सोशल डिस्टेन्सिंगबाबत जनजागृती केली.यावेळी नागरिकांना घाबरू नका, घरी राहा आणि देशहितास प्राधान्य देण्याचे आवाहन पोलीसांनी केले. पोलीस निरिक्षक हिवरे यांच्या नेतृत्त्वात हा फ्लॅग मार्च काढण्यात आला. परिसरात फ्लॅग मार्च पोहचताच नागरिकांनी पोलीसांवर पुष्पवर्षाववर केला आणि टाळी वाजवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व दिव्यांग व्यक्तींनी व्हील चेअरवर बाहेर येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीसांचा हा रुट मार्च श्रेयांस गार्डन येथून सुरू झाला. यावेळी दिलीप सारडा, गिरीश सुराना, राधेश्याम सारडा, संजय पुगलिया, राजू आया, दिलीप ठक्कर, महेंद्र कटारिया, जिन्नू बदानी, जगदीश अग्रवाल, तायल, कमल तपडीया, लष्करे, राहुल जव्हेरी, मनियार, सुंदर अग्रवाल, अभय संघवी, रामू अग्रवाल, जोशी, जयंत बुंदेला, बिरदीचं चोरडिया, संजय अग्रवाल, दिलीप रांका, उज्वल पगरिया, विजय झंवर, गोयल, अतुल कोटेचा, पवन पोद्दार, विकास जैन, भावेश करिया, गिरीश सुराणा, गुड्डू बूदला, रोशन तायल, शंकरलाल केडिया, संजय सुरजन, विपिन शाह, राहुल जवेरी, गिरीश अग्रवाल, रिंटू अग्रवाल, संजय पुगलिया, निशांत अग्रवाल यांनी आपापल्या निवासस्थानाहून पोलीसांचे स्वागत केले.अराजक तत्त्वांचा धुडगूसशहरात लॉकडाऊन असतानाही या भागात काही अराजक तत्त्व बुधवारी रात्री शिरले होते. त्यांच्याकडे शस्त्रही होते. यावेळी येथील चौकीदारांनी त्यांचा प्रतिकार करत एकास पकडले आणि अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. लॉकडाऊनचा फायदा घेत असे अराजक तत्त्व संधी साधत असल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस