शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  कथित गोळीबाराने पोलिसांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:33 IST

जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ठळक मुद्देवचपा काढण्यासाठी क्लृप्ती : तक्रार करणाराच निघाला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.इंडिगो कारमधून आलेल्या चार ते पाच गुंडांनी उप्पलवाडीत येऊन पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती फिरोज खान नामक तरुणाने जरीपटका पोलिसांना कळविली. त्यापूर्वी त्याने ही माहिती नियंत्रण कक्षातही दिली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस जिमखान्यात वार्षिक गुन्ह्यांचा आढावा घेत होते. हे वृत्त कळताच परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार आणि जरीपटका तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा उप्पलवाडीत पोहचला. त्यांनी फोन करणाऱ्या फिरोज खानला शोधून काढले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहचले. आरोपींनी चार गोळ्या झाडल्याचे फिरोज सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे रिकाम्या पुंगळ्या शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, काडतुसाची एकही पुंगळी पोलिसांना आढळली नाही. त्यामुुळे आजूबाजूच्या मंडळींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणीच असे काही घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिरोजने सांगितलेल्या विलास नामक तरुणाला आणि साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेच्या वेळी आपण दुसऱ्याच भागात कामावर होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीतून गोळीबाराची शहानिशा केली. मात्र, त्यातही काहीच आढळले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनी फिरोजलाच त्यांच्या पद्धतीने बोलते केले. सुरुवातीला विसंगत माहिती देणारा फिरोज अखेर खरे बोलला. असे काही झालेच नाही. ज्यांनी गोळीबार केला, असे सांगितले त्या तरुणांसोबत आपले पटत नाही. ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण गोळीबाराची खोटी तक्रारवजा माहिती पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.दरम्यान, गोळीबार घडलाच नाही. कांगावा करणाऱ्या फिरोजने त्याच्याशी रात्री दारूच्या नशेत विलास आणि सोनूसोबत वाद झाला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी हा उपद्रव करून पोलीस यंत्रणेची तारांबळ उडवून दिल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार