शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

आरोग्य उपसंचालकाच्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:08 IST

भिवापूर : आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. ...

भिवापूर : आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिसांनी या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. दुपारनंतर चाललेल्या या शोधमोहिमेमुळे मात्र शहर आणि ग्रामीण पोलिसांची तारांबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास घरगुती कारणामुळे दुखावलेला सारंग कुणालाही न सांगता घरून निघून गेला. यावेळी तो लाल रंगाची अ‍ॅक्टिव्हा क्र. एम.एच.३१/ ई.जी. ४२५४ ही दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. दुपारपर्यंत त्याचा पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नागपूर शहर पोलिसात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान दुचाकीवर जाताना त्याचे छायाचित्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्या आधारावर नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी तपासचक्र फिरविले. याबाबत सोशल मीडियावर देखील संदेश व्हायरल होऊ लागले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भिवापूर पोलिसांना सूचना केल्याने ठाणेदार महेश भोरटेकर यांनी राष्ट्रीय मार्गावर नाकाबंदी व तपासणी सुरू केली होती. अशातच सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ठाणेदार भोरटेकर यांना एका लाल रंगाच्या अ‍ॅक्टिव्हावर संशय आला. लागलीच त्याला थांबवून विश्वासात घेत विचारपूस केली. खात्री पटताच ठाणेदार भोरटेकर यांनी वरिष्ठांसह त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर तासाभरातच त्याचे पालक भिवापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. सारंगचा शोध लावल्याबद्दल पालकांसह वरिष्ठांनी भिवापूर पोलिसांचे कौतुक केले.

सावध अन् सतर्क

हायप्रोफाईल कुटुंबातील मुलगा असल्यामुळे पोलीस तेवढ्याच ताकदीने चौकस होते. दरम्यान लाल रंगाची अ‍ॅक्टिव्हा दिसली. मात्र त्याचा पाठलाग केल्यास अपघाताची भीतीसुद्धा होती. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीने काही अंतर प्रवास केला. यानंतर सदर युवकाला थांबविले. या संपूर्ण कारवाईत पोलीस सावध आणि सतर्क होते.