शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्यांना धडा शिकविण्याकरिता पोलिस तक्रार रामबाण उपाय झाला : हायकोर्टाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:24 IST

कौटुंबिक वादानंतर सासरच्या मंडळींना धडा : विवाहितांच्या प्रवृत्तीवर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक वादानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकविण्यासाठी पोलिस तक्रारीचा रामबाण उपाय म्हणून वापर केला जात आहे. आजकाल विवाहितांमध्ये ही प्रवृत्ती फार वाढल्याचे निदर्शनास आले आहे, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

बरेचदा पतीच्या नातेवाइकांवर वाईट हेतूने गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात. त्यामुळे त्यांना निरपराध असतानाही फौजदारी कारवाईच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यांना जाणीवपूर्वक कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये गोवले जाते, असेदेखील न्यायालय म्हणाले. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला. विवाहिता सीमा आवारे यांच्या तक्रारीवरून वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव येथील पती संदीप, सासरा देवीदास, सासू कमलाबाई व इतर पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ व इतर संबंधित गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला होता. तसेच, न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाला पती वगळता इतर सर्व आरोपींवर अपमानास्पद वागणूक देणे, पतीला चिथावणी देणे असे सामान्य स्वरूपाचे आरोप केले गेले असल्याचे आणि तक्रारीमध्ये वेळ, तारीख, ठिकाण, छळाचे स्वरूप इत्यादीबाबत विस्तृत माहिती दिली गेली नसल्याचे आढळून आले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित परखड मत व्यक्त करून पती वगळता इतर सर्व आरोपींविरुद्धचा एफआयआर व खटला रद्द केला.

पतीवरील खटला कायमसीमा यांचे सर्व मुख्य आरोप पती संदीपविरुद्ध असल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने संदीपविरुद्धचा एफआयआर व खटला कायम ठेवला. या दाम्पत्याचे २ जून २०१४ रोजी लग्न झाले आहे. वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने घटस्फोटासाठीही याचिका दाखल केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय