शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:07 IST

मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देइव्हेन्ट कंपनीच्या संचालकांची तक्रार : गिट्टीखदान पोलिसांकडून चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात मंगळवारी रात्री बॉलिवूडच्या एका पार्श्वगायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी शहरात जागोजागी होर्डिंग लावण्यात आले होते. शिवाय मोठमोठ्या हॉटेल्स आणि मॉलमध्ये या शोच्या तिकिटाही विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य गायकाने या शोसाठी ३० लाख रुपये घेतले होते तर अन्य एका महिला गायकाने ५ लाख रुपये घेतले होते. खर्च अवाढव्य झाला तरी अपेक्षेप्रमाणे तिकिटा विकल्या गेल्या नाही. आयोजकांना पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम तब्बल दीड ते दोन तास उशिरा सुरू झाला. त्यात स्टेजच्या बाजूला असलेल्या भागातील पडदा फाडून मोठ्या संख्येत बघे आतमध्ये शिरले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अशात मुख्य गायक रात्रीचे ८.४५ वाजले तरी स्टेजवर आला नाही. त्यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला.हॉटेलमध्ये गोंधळदरम्यान, मुख्य गायक आणि सहकाऱ्यांची व्यवस्था इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीने वर्धा मार्गावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये केली होती. गायक निघण्याच्या तयारीत असताना हॉटेलचे बिल पाठविण्यात आले. गायकाने आयोजकाकडे बोट दाखवले तर आयोजकांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांना बोलविण्यात आले. त्यांनी आपला धनादेश दिल्यानंतर ‘चेक आऊट’ झाले. दरम्यान, आयोजकाने ठरविल्याप्रमाणे आपली रक्कम वेळेवर दिली नाही. आपली फसवणूक केली, अशी तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी गिट्टीखदान ठाण्यात दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत लगेच चौकशी सुरू केली. शुक्रवारी यासंबंधाने पोलीस चौकशी अन् कारवाई करणार असल्याचे गिट्टीखदान पोलिसांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी