शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राणा दाम्पत्याच्या रॅलीवर निर्बंध; हनुमान चालीसा म्हणा, मात्र भोंग्यांना परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 11:19 IST

Hanuman Chalisa row : राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट नागपुरात एकाच मंदिरात हनुमान चालीस पठण करणार असून शहरातील वातावरण भक्तिमय होणार असले तरी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा व पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य आज नागपुरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. याच वेळी त्याच मंदिरात राष्ट्रावादी काँग्रेसतर्फेही हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही गटांनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली असता त्यांना  भोंग्याविना हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

राणा दाम्पत्य हे ३६ दिवसानंतर पुन्हा अमरावतीत परतणार आहे. नागपुरात आल्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून ते अमरावतीकडे रवाना होणार आहेत. पोलिसांनी त्यांना हनुमान चालीसा पठणाची परवानगी दिली असली तरी नागपूर विमानतळावरून मंदिरापर्यंतर रॅली काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यासह अटी शर्थी घालण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

मंदिरात हनुमान चालीसा पठणासाठी परवानगीची गरज नाही. मात्र, बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही आयोजकांना देण्यात आली आहे. याशिवाय राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हनुमान चालीसा पठण केले जाईल. त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याबरोबरच राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्य, दोघांनीही प्रक्षोभक वक्तव्य करु नये ही अट पोलिसांनी घातली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाNCPराष्ट्रवादी काँग्रेस