शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत साकारतोय ‘पोलीस नागरिक मैत्रेय चौक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:47 IST

पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे.

ठळक मुद्देवनराई फाऊंडेशननिर्मित अनोख्या शिल्पाकृतीचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या ठिकाणी तीन प्रमुख रस्ते येऊन मिळतात त्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. वनराई फाऊंडेशनद्वार२ निर्मित या शिल्पाकृतीला ‘पोलीस नागरिक मैत्रेय’चौक असे नाव देण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा चौक अनोख्या शिल्पाकृतीमुळे नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे.पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते रविवारी या शिल्पाकृतीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, नगरसेवक अ‍ॅड. निशांत गांधी, नगरसेविकास रूपा रॉय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, विवेक मासाळ, विक्रम साळवी आणि पोलीस उपायुक्त निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. विकास ठाकरे, गिरीश गांधी आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या शिल्पाकृतीबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, उपाध्यक्ष किशोर धारिया, अनंत घारड, नीलेश खांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले. तर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी आभार मानले.असे आहे शिल्पही शिल्पाकृती प्रतिकात्मक आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जवान, सुरक्षा दल, सेनादल व पोलीस तैनात असतात. वेळ पडल्यास नागरिकांच्या संरक्षणासाठी ते आपल्या प्राणाचीही आहुती देत असतात. या सर्व बाबींचा शिल्पाकृतीत समावेश करण्यात आला आहे. या शिल्पाकृतीमध्ये मध्यभागी एक कुटुंब दर्शविले आहे. यात आई-वडील व बाजूला असलेली दोन मुले असून त्यांच्या उजव्या हातात संविधान तर डाव्या हातात कमळ हे शांतीचे प्रतीक आहे. या कुटुंबाच्या चहुबाजूला आपल्या देशाचे रक्षण करणारे पोलीस आॅफिसर, हेड कॉन्स्टेबल, ट्रॅफिक पोलीस, कमांडो, आर्मी सुरक्षा दल आपापली पोझिशन घेऊन तैनात आहेत. परिवाराच्या या शिल्पाच्या मागे महाराष्ट्र पोलिसांचा स्टार दाखवण्यात आला आहे. माजी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम आणि गिरीश गांधी यांची ही संकल्पना असून ही अनोखी शिल्पाकृती नागपूरचे तरुण शिल्पकार निखील बोंडे व अमित पांचाळ यांनी तयार केलेली आहे. यासाठी उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी आर्थिक मदत केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक