शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
5
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
6
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
7
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
8
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
9
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
10
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
11
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
12
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
13
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
14
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
15
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
16
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
17
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
18
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
19
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
20
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे

पोलिसांनो कडक व्हा,उपद्रवींना फिरणाऱ्यांना आवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:00 IST

रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहेत, अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकाहींना अजूनही वाटतेय गंमत : विनाकारण फिरताहेत रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन-प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. यासाठी लॉकडाऊन व कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. बहुतांश लोक याचे पालन करीत पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहे. परंतु काही जणांना अजूनही याचे गांभीर्य कळालेले नाही. ते गंमत म्हणून पाहत आहेत. रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहे. अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेद्वारा वारंवार नागरिकांना आपल्या घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु काही लोक अजूनही ऐकायला तयार नाहीत. ते विनाकारण रस्त्यावर येत आहेत. गर्दी करीत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहने फिरत आहेत. प्रत्येक चौकात पोलीस आहेत. परंतु तेही हतबल दिसून येतात. काही जण मदतीच्या नावावर शहरभर फि रत असल्याचे प्रकारही होत आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु सामान्य नागरिक व खरच कामासाठी बाहेर पडलेल्यांना मात्र याचा फटका बसता कामा नये, इतकी काळजी निश्चित घ्यावी.
उपद्रवींना कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत लावावारंवार आवाहन करूनही काही लोक ऐकायलाच तयार नाही. ते विनाकारण रस्त्यावर येत आहेत. अशा लोकांविरुद्ध नागरिकांमध्येही प्रचंड चिड निर्माण होत आहे. अशा लोकांना पोलिसांनी पकडावे परंतु त्याना मारहाण न करता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत लावावे. त्यांच्याकडून रक्तदान करवून घ्यावे, मोठा दंड आकारावा, अशा प्रकारचे मॅसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.नागरिकांनीही विनाकारण गर्दी करू नयेअत्यावश्यक सेवा २४ तास सुरु आहेत. तेव्हा नागरिकांनीही विनाकारण दुकानांमध्ये गर्दी करू नये. कुटुंबातील सदस्यांना बाहेर जाण्यापासून रोखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वाहनांचे पासेस बंद व्हावेअत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत शहरात ९ हजारावर वाहनांना पासेस देण्यात आले आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर राहतीलच. रस्त्यावरील गर्दी आणखी वाढू नये म्हणून पास देणे आता बंद करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस