शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पोलिसांच्या लेखी फरार असलेले धवड आमदाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 23:46 IST

नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर फोटो व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, धवड यांनी बँकेचे काही संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून पदाचा दुरुपयोग करीत आरोपी सचिन मित्तल आणि बालकिशन गांधी यांच्या ग्लॅडस्टोन समूहास, हिंगल समूहास, जोशी तसेच झाम समूहाला कर्जफेडीची क्षमता न तपासता कोट्यवधींचे कर्ज दिले होते. आरोपींनी तारण ठेवलेल्या मालमत्तेची पडताळणी न करता अनेक कर्जदारांना बँकेच्या एक्सपोजर लिमिटपेक्षा अधिक जास्त कर्ज मंजूर केले. त्यामुळे बँक बुडाली. नवोदय बँकेत ३८ कोटी ७५ लाखांचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणातून उघड झाल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आतापावेतो कुख्यात बिल्डर हेमंत झाम, त्याचा काका मुकेश झाम, मुकेशची पत्नी तसेच नातेवाईक यौवन गंभीर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. तर, १७ आॅक्टोबरला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे यांनाही ईओडब्ल्यूच्या पथकाने अटक केली होती. बँकेचे अध्यक्ष धवड आणि अन्य काही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आम्ही त्यांचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस सांगत असतानाच, आज सायंकाळी ६.२० च्या सुमारास खुद्द अशोक धवडच फेसबुकवर सक्रिय झाले.उत्तर नागपूरचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करतानाचा फोटो खुद्द धवड यांनीच त्यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड केला. या फोटोत त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नरेंद्र जिचकार आणि नितीन कुंभलकर दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.सायबर सेल सक्रिय, पोलिसांची धावपळ!विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलिसांचे धवड यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, हा फोटो व्हायरल करून खुद्द धवड यांनीच पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पोलिसांचा सायबर सेल सायंकाळी अचानक सक्रिय झाला. त्यांचे लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ वाढल्याचे दिसत होते.पोलिसांचे वेट अ‍ॅन्ड वॉच !सर्वोच्च न्यायालयाने धवड यांना बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २१ दिवसांचा अवधी दिला होता. त्याला आणखी चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे धवड समोर असूनही पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, अशी माहिती या प्रकरणात संबंधित सूत्रांकडे विचारणा केली असता पुढे आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजी