शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पोळा : पारंपरिक पूजन पण सार्वजनिक उत्सवावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 21:04 IST

वर्षभर बळीराजासोबत शेतात कष्ट उपसणाऱ्या जिवाभावाचा सोबती बैलांच्या कृतज्ञतापूर्वक पूजनाचा सण म्हणजे पोळा. मात्र दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. कोरोना महामारीने जसे यावेळी प्रत्येक सणाच्या उत्सवावर विरजण घातले, तसे पोळा सणावरही आहे.

ठळक मुद्देबैलजोडीची घरीच पूजा, गोडधोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्षभर बळीराजासोबत शेतात कष्ट उपसणाऱ्या जिवाभावाचा सोबती बैलांच्या कृतज्ञतापूर्वक पूजनाचा सण म्हणजे पोळा. मात्र दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. कोरोना महामारीने जसे यावेळी प्रत्येक सणाच्या उत्सवावर विरजण घातले, तसे पोळा सणावरही आहे. शहरांपेक्षा गावात या सणाला विशेष महत्त्व आहे. मात्र शारीरिक अंतराच्या नियमामुळे सार्वजनिक उत्साह साजरा करता आला नाही. असे असले पारंपरिक उत्सव थांबला नाही. लोकांनी परंपरेनुसार सर्जा-राजाचे पूजन केले.दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी हळद आणि कच्च्या तुपाने वेदनेवर फुंकर घालत खांदेशेकणी केली जाते व दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे आमंत्रण दिले जाते. त्याला सजवून पोळ्याच्या दिवशी सर्व शेतकरी बैलांना घेऊन सार्वजनिक स्थळी जमा होतात. झाडत्या म्हणून आरोळ्या दिल्या जातात आणि गावाच्या मानवाईक व्यक्तीकडून झेंडी तोडून 'पोळा फुटला' असे जाहीर होताच शेतकरी घरोघरी जाऊन पुरणपोळी व पंचपक्वान्नाचे आराध्य अर्पिले जाते. यावर्षी हे सर्व सार्वजनिक सोपस्कार करणे शक्य होऊ शकले नाही. मात्र बळीराजाने त्याच्या सोबत्याला पारंपरिक मानसन्मान नक्की दिला.सकाळी त्याची आंघोळ करून त्याला झूल, चौरंग मटाटे यांनी सजविण्यात आले आणि घरीच गृहिणीच्या हस्ते त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांना पुरणपोळीचे आराध्य अर्पण करण्यात आले. कोरोनाच्या संकटात सार्वजनिक पोळा भरला नसला तरी बैलांप्रति कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्याची परंपरा पाळण्यात आली. ग्रामीण भागात हे चित्र दिसले.गोडधोड आणि उत्साहग्रामीण भागासह शहरातही बहुतेकांच्या घरी महिलांनी पुरणपोळी, अनारसे, करंज्या अशा गोडधोड पक्वान्नांनी पोळ्याचा उत्सव साजरा केला. चौकात मातीच्या बैलाची प्रतिकृती आणून घरी पूजन करण्यात आले.द्वारावर पळसाच्या फांद्यापोळ्याच्या दुसऱ्या म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी पहाटे वैशिष्टय असलेली मारबत गावाच्या वेशीवर शिरवली जाते आणि रोगराई, अनिष्ट नष्ट करण्याचे आवाहन केले जाते. या परंपरेनुसार घरोघरी पळसाच्या फांद्या (मेढे) द्वारावर ठेवण्यात आल्या.पारडी, काछीपुऱ्यात नाही भरला पोळादरवर्षी शहरात पारडी येथे उत्साहात पोळा साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ४०-५० बैलजोड्या येथे गोळा होतात. काछीपुºयातही बैलजोड्या आणून पोळा भरविला जातो. मात्र यावेळी कोरोनाच्या प्रकोपामुळे पोळा साजरा न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. त्यामुळे दोन्ही भागातील आयोजकांनी पोळा भरविण्यापासून माघार घेतली. त्यामुळे उत्साहावर विरजण पडले आहे.गावाची वारी थांबलीपोळा आला की गावाकडून शहरात आलेले लोक आपल्या गावाचा रस्ता धरतात. पोळा साजरा करताना तेथे मित्र, नातेवाईक आणि गावातील जुन्या माणसांशी भेटगाठ होते. मात्र यावेळी कोरोनाने सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले. गावची वाट बंद झाली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर