शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:20 IST

लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.

ठळक मुद्देवर-वधूंसह ३८ जणांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.मासोद (ता. काटोल) येथील कृष्णाजी ढोबळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा बुधवारी (दि. ९) कोंढाळी येथील एका मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्याला मासोद येथील बहुतांश नागरिकांनी हजेरी लावली होती. शिवाय, त्यांनी लग्नात जेवणही केले होते. मात्र, यातील काहींना गुरुवारी (दि. १०) ओकारी व हगवणीचा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे मासोद येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. वर्षा बोरकर यांनी उपचाराला सुरुवातही केली. शिवाय, कृष्णाजी अटलवार (७०, रा. मासोद) यांना कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.दुसरीकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल व चमू मासोद येथे दाखल झाली. शुक्रवार (दि. ११) दुपारपर्यंत मासोद येथील उपकेंद्रात १८ जणांवर उपचार करण्यात आल्याची तसेच विषबाधेचे एकूण ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ. येरमल यांनी दिली. गजानन धारपुरे (७०), मीराबाई चोपडे (५४), मंगला ढोले (३४) व अथर्व संजय धारपुरे (१२) सर्व रा. मासोद यांच्यावर मासोद येथे उपचार करण्यात आले.माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. जयश्री वाळके, यू.आर. निकम यांनी शुक्रवारी मासोद उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर व स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली.पाण्याचे नमुने तपासणीला पाठविलेलग्नात पालकची दाळभाजी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, पिण्यासाठी ट्रॅक्टरने प्लास्टिकच्या टाकीमध्ये पाणी आणले होते. त्यात बर्फ टाकण्यात आला होता. पाण्यातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पाण्याचे नमुने तसेच मासोद येथील नळयोजनेच्या पाण्याचे नमुने तपासणीला पठविले असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली. गावात शनिवारपासून (दि. १२) सर्वेक्षण केले जाणार असून, नागरिकांना ‘मेडीक्लोर’चे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाnagpurनागपूर