शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह ५ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन

By नरेश डोंगरे | Updated: March 11, 2024 22:23 IST

नागपूर विभागातील १० ठिकाणी प्रकल्प : मुकूटबनला गती शक्ती कार्गो टर्मिनल्स, तर राजूरच्या नवीन गुड्स शेडचे लोकार्पण.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी, १२ मार्च रोजी नागपूरसह विभागातील ४ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन तर बडनेरा, अकोला आणि नागभीडसह अन्य तीन ठिकाणी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम दिल्लीतून ऑनलाईन पार पडणार आहेत.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी देशभरात ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण करणार आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील 'बॉटल नेक' म्हणून ओळखला जाणाऱ्या नागपूर - वर्धा मार्गाच्या तिसऱ्या आणि चवथ्या रेल्वे लाईनच्या लोकार्पणाचाही समावेश आहे. या संबंधाने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. नागपूर रेल्वे स्थानक, पांढूर्णा, पुलगाव, बल्लारशाह, बैतूल या पाच रेल्वेस्थानकावर स्थानिक उत्पादकांना ग्राहक मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ओएसओपी (एक स्थानक, एक उत्पादन) स्टॉलचे उद्घाटन होईल. बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरंट आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथील जनऔषधी केंद्राच्या लोकार्पणाचाही यात समावेश आहे. त्याचप्रमाणे मुकूटबन स्थानकावर गती शक्ती कार्गो टर्मिनलचे लोकार्पण, तर राजूर स्थानकावर राजूर गुडस् शेडचे लोकार्पण केले जाईल. खापरी, सेवाग्राम आणि तिगाव स्थानकावर थर्ड आणि फोर्थ लाईनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम ऑनलाईन (व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून) पार पडेल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, एडीआरएम टी. एस. खैरकर, सिनियर डीईएन पद्मनाभन झा, सीनियर डीएससी मनोज कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

अशाच प्रकारे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (दपूम) अंतर्गत येणाऱ्या कळमना - राजनांदगाव दरम्यानच्या कन्हान ते धनाैली सालवा, गुदमा पर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाईने लोकार्पण केले जाणार आहे. नव्या वंदे भारत ट्रेन तसेच ४ वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार होईल. १७ स्थानकांवर ओएसओपी स्टॉल, तीन नवीन गुडस् शेड, दोन जन औषधी केंद्रे आणि गती शक्ती कार्गोचेही लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे दपूमच्या विभागीय व्यवस्थापक नम्रता त्रिपाठी यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर