शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:12 IST

भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सात आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसात आरोपींपैकी तिघांना अटक : मसाळा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सात आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे.मंगेश आबाजी भोयर (३५, रा. मसाळा, ता. कामठी) असे मृताचे नाव असून, मोहन कारोकार, विनोद कानबा कारोकार (२५), वासुदेव कानबा कारोकार, मंगेश कारोकार, दादू कारोकार, लकीसिंग रणजितसिंग सिंदुरिया व प्रवीण डबले, सर्व रा. मसाळा, ता. कामठी अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी विनोद कारोकार, वासुदेव कारोकार व लकीसिंग सिंदुरिया या तिघांना अटक केली. जखमींमध्ये आबाजी भोयर व तनबाजी कारोकार यांचा समावेश आहे. आरोपी विनोदचे वडील कानबा कारोकार यांचा मसाळा येथे भूखंड असून, त्या भूखंडावर मृत मंगेशचे वडील आबाजी भोयर यांनी अतिक्रमण केले. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायतने सदर अतिक्रमण हटविण्यासाठी आबाजी भोयर यांना नोटीस बजावली. मात्र, त्यांनी अतिक्रमण हटविले नाही.दरम्यान, याच कारणावरून विनोद, त्याचा भाऊ वासुदेव व अन्य पाच जणांनी सोमवारी सकाळी मंगेशला गाठले आणि त्याला याबाबत विचारणा केली. वाद चिघळल्याने या सातही जणांनी मंगेश, त्याचे वडील आबाजी व तनबाजी कारोकार यांना लोखंडी रॉड व काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तिघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे मंगेशचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी भादंवि ३०२, ३२६, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिवाय, कारोकार यांच्या तक्रारीवरून आबाजी भोयर यांच्याविरुद्ध अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सात दिवसांची पोलीस कोठडीया प्रकरणात पोलिसांनी विनोद कारोकार, वासुदेव कारोकार व लकीसिंग सिंदुरिया या तिघांना मंगळवारी सकाळी अटक केली. त्यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना सात दिवसांची अर्थात सोमवारपर्यंत (दि. २ जुलै) पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, या घटनेतील अन्य चार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर