शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा वाढवून देण्याची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:48 IST

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला २५९ जागा वाढवून देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता फेटाळून लावली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : शासकीय महाविद्यालयात राहील यथास्थिती

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला २५९ जागा वाढवून देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे या अभ्यासक्रमातील जागांची स्थिती जैसे थे राहणार आहे.यासंदर्भात परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ्यांनी रिट याचिका दाखल केली होती. राज्य सीईटी सेलद्वारे २०१८-१९ या शैक्षणिक सत्राकरिता ६ जुलै २०१९ रोजी प्रकाशित सीट मॅट्रिक्सनुसार राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात एकूण ३,११० जागा उपलब्ध होत्या. २०१९-२० या शैक्षणिक सत्रामध्ये आर्थिक दुर्बल घटकांचे १० टक्के आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाच्या १२ टक्के आरक्षणामुळे ९७० जागा वाढविण्यात आल्या. त्यामुळे एकूण जागा ४,०८० झाल्या. परंतु, आदल्या वर्षीच्या तुलनेत खुल्या प्रवर्गाच्या २५९ जागा कमी झाल्या. आदल्या वर्षी खुल्या प्रवर्गाला ११३४ जागा मिळाल्या होत्या. परिणामी, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. जागा कमी झाल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, असे त्यांचे म्हणणे होते.ऑफिस मेमोरन्डमचा फायदा नाहीआर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणामुळे इतर प्रवर्गांवर अन्याय होऊ नये, याकरिता केंद्रीय शिक्षण संस्थांना आवश्यक जागा वाढविण्याची मुभा आली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने १७ जानेवारी २०१९ रोजी ऑफिस मेमोरन्डम जारी केले आहे. त्यानुसार, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने राज्य सीईटी सेलचे उत्तर लक्षात घेता, हे ऑफिस मेमोरन्डम राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना लागू होत नसल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, राज्य सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. नहुष खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टरStudentविद्यार्थी