शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

इंडोरामा कामगार गृह प्रकल्प गैरव्यवहारावरील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:16 IST

इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : खासगी वाद असल्याचे स्पष्ट केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.पंकज ठाकरे व इतर चौघांनी ही याचिका दाखल केली होती. योजनेवर खासदार व आमदार निधीतील रक्कम खर्च करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने हा आक्षेप निरर्थक ठरवून संबंधित रक्कम सुविधांवर, म्हणजे विद्युतीकरण व रोड बांधण्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले. तसेच, बांधकाम दर्जासंदर्भात तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये तरतूद असल्याचे नमूद केले. याचिकेतील सर्व मुद्दे योग्य ठिकाणी मांडण्याकरिता कायम ठेवण्यात येत असल्याचेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.असे होते याचिकेतील मुद्दे२००८ मध्ये इंडोरामा संस्थेने सदस्य कामगारांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी योजना आणली. त्यासाठी एमआयडीसीकडून १६ हजार चौरस मीटरचा भूखंड मिळवला. सुरुवातीला एक घराची किंमत २ लाख ३० हजार रुपये ठरविण्यात आली होती. त्यानंतर किंमत ४ लाख ८० हजार करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १२८ तर, दुसऱ्या टप्प्यात २७२ घरे बांधण्यात आली. कामगार घरांमध्ये राहायला गेले असता पहिल्याच वर्षापासून छत गळायला लागले. भिंतींना भेगा पडल्या. घरांच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. त्यामुळे संस्थेवर कारवाई होणे आवश्यक आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर