नागपूर : सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५६ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४ दिवस मृत्यूशी झुंज दिली़ त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे़खामला चौक येथे १० एप्रिल रोजी संध्याकाळी संजय काशीकर यांना एका वाहनाने धडक दिल्याने, ते डिव्हायडरवर पडले़ त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी नाट्यक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती़ संजय काशीकर यांच्या निधनाने नागपूरकर रंगकर्मींना मोठा धक्का बसला आहे़ उत्कृष्ट दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून त्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय नाट्य परिषदेसह इतरही अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळवले़ (प्रतिनिधी)
नाटककार संजय काशीकर यांचे निधन
By admin | Updated: April 25, 2017 02:12 IST