शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला : संतप्त व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:11 IST

कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने लकडगंज ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी प्रकरण हाताळल्याने तणाव निवळला.

ठळक मुद्देमारहाण करून रक्तबंबाळ केले : प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने लकडगंज ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी प्रकरण हाताळल्याने तणाव निवळला. 

जैन आज दुपारी परवारपुरा येथील जैन मंदिरात दर्शनाला आले होते. ते त्यांची कार नगरसेविका आभा पांडे यांच्या कार्यालयासमोर पार्क करीत असताना तेथील कर्मचारी विक्की चौधरी आणि पांडे यांचे वाहनचालक ललित पटेल यांनी मनीष जैन यांच्यासोबत अरेरावी करून त्यांना तातडीने कार हटविण्यास सांगितले. त्यावरून बाचाबाची सुरू असतानाच विक्की आणि ललितने मनीष यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. ही माहिती कळताच मनीष यांचे मित्र तसेच मोठ्या संख्येत व्यापारी लकडगंज ठाण्यासमोर धडकले. मनीष यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, अशी त्यांची मागणी होती.लकडगंज पोलीस त्यांची समजूत काढत असतानाच विक्की चौधरीचे वकील पोलीस ठाण्यात पोहचले. ते पाहून मनीष यांच्या सहकाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यांनी ठाण्याच्या आवारात वकिलाला घेराव करून जोरदार घोषणाबाजी केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. ही माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर तातडीने लकडगंज ठाण्यात पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखत बाजूच्या पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस दल मागवून घेतले तसेच तक्रार द्या, लगेच कारवाई करू, असे आश्वासन देत व्यापाऱ्यांना शांत केले.परस्परांविरुद्ध तक्रारीत्यानंतर मनीष यांनी विक्की चौधरी तसेच ललित पटेल विरुद्ध हल्ला करून सोनसाखळी लुटल्याची तसेच धार्मिक भावना भडकविणारी शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली. हे कळताच विक्की चौधरीने आपल्या साथीदारांसह लकडगंज पोलिसांकडे पोहचून मनीष तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. पोलीस दोन्ही तक्रारींची शहानिशा करीत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे