शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 प्लास्टिक बंदी हटवा :  पाच लाख लोकांचा रोजगार बुडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 21:19 IST

राज्यातील औद्योगिक संघटनांशी चर्चा न करता वा कुठलाही पर्याय न शोधता राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा एकतर्फी निर्णय मागे घेण्याची मागणी करीत विदर्भातील प्लास्टिक उद्योगाशी संबंधित हजारो उद्योजक आणि व्यावसायिक शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी धडकले.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी धडकले उद्योजक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील औद्योगिक संघटनांशी चर्चा न करता वा कुठलाही पर्याय न शोधता राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा एकतर्फी निर्णय मागे घेण्याची मागणी करीत विदर्भातील प्लास्टिक उद्योगाशी संबंधित हजारो उद्योजक आणि व्यावसायिक शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी धडकले. विविध मागण्यांचे निवेदन गडकरी यांना देत त्यांच्याशी बंदी मागे घेण्यावर विस्तृत चर्चा केली. या प्रकरणी लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन गडकरी यांना उद्योजकांना दिले.नवीन गुंतवणुकीवर परिणामराज्य सरकारने एकतर्फी घेतला आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे लहानमोठे हजारो उद्योग डबघाईस आले आहेत. शिवाय थेट पाच लाख लोकांचा रोजगार बुडाला असून दहा हजारांपेक्षा जास्त कोटींची गुंतवणूक संकटात आली आहे. बाहेरच्या राज्यातील आॅर्डर रद्द झाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान आणि नवीन गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. प्लास्टिक हद्दपार झाल्याचा परिणाम किरकोळ बाजारात झाला आहे. गडकरी यांनी जातीने लक्ष देऊन बंदी हटवावी, अशी मागणी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष अतुल पांडे, सचिव डॉ. सुहास बुद्धे, उपाध्यक्ष सुरेश राठी, माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, विदर्भ प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, सचिव हरीश मंत्री, माजी अध्यक्ष दिलीप गांधी, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, व्हीआयएचे सहसचिव पंकज बक्षी, विदर्भ डिस्पोसेबल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश बतवानी, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष श्रीकांत घोंडरीकर यांनी केली.शासनाने प्लास्टिक वेस्ट रिसायकल इंडस्ट्रीकरिता धोरण तयार करावे आणि राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग, बचत गट, गृहउद्योगात कार्यरत लाखो लोकांना दिलासा द्यावा. २००६ च्या अधिसूचनेनुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी आणू नये, अशी मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली.या प्रसंगी अ‍ॅक्शन कमिटीचे सदस्य गिरीधारी मंत्री, नरेश जैन, शैलेश सूचक, मनीष जैन यांच्यासह पॅकेज ड्रिकिंग वॉटर असो., नागपूर हॉटेल ओनर असो., डिक्की विदर्भ चॅप्टर, कळमेश्वर इंडस्ट्रीज एमआयडीसी असो., नागपूर होलसेल होजिअरी अ‍ॅण्ड रेडिमेड गारमेंट मर्चंट असो., होलसेल क्लॉथ मर्चंट्स असो., व्हीआयए महिला विंग, महिला गृहउद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीagitationआंदोलन