शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:22 IST

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देवाडीतील घटना : नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.धीरज रमेश फुसे (२५, आंबेडकरनगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. तो नवीन मोटरसायकल (क्र. एमएच-३१/टीसी-००२६)ने वाडीकडून नागपूरकडे जात होता. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याचे संतुलन बिघडले. त्यातच त्याची मोटरसायकल रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये धीरज हा गंभीररीत्या जखमी झाला. तेथे हजर असलेल्या नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा प्रयत्न केला असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांंनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. खड्डे त्वरित न बुजविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर विद्यापीठ परिसर (कॅम्पस्) ते नाका क्र. १० पर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. परिणामी दुचाकी चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा यातूनच अपघाताच्या घटना घडल्या. त्यानंतरही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यातच शनिवारी खड्ड्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. आतातरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याची डागडुजी करणार काय की आणखी अपघातांची प्रतीक्षा करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू