शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या सुरक्षा रक्षकाचे पिस्तूल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:00 IST

आंध्र प्रदेशातील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे ९ एम.एम.ची आणि १० राऊंड असलेली पिस्तूल संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोमवारी चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसंघमित्रा एक्स्प्रेसमधील घटना : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंध्र प्रदेशातील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे ९ एम.एम.ची आणि १० राऊंड असलेली पिस्तूल संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोमवारी चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ताल्लुर मोहनराव शिवरामय्या (४३) रा. नेल्लोर, आंध्र प्रदेश असे फिर्यादी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर आंध्र प्रदेशमधील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार बी. व्ही. रामाराव हे १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसने ओंगल ते नागपूर असा प्रवास करीत होते. ए-१ कोचमध्ये त्यांचा ३४ क्रमांकाचा बर्थ होता. यावेळी सुरक्षा रक्षक ताल्लुर त्यांच्यासोबत होता. त्याच्याकडे ९ एमएमचे १० राऊंड असलेले पिस्तूल होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी आ. रामाराव यांचे लक्ष सुरक्षा रक्षकाच्या कंबरेकडे गेले, त्यावेळी पिस्तूल त्यांना दिसले नाही. त्यांनी त्याला पिस्तूलबाबत विचारल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने कोचमध्ये पिस्तूलचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळले नाही. सकाळच्या सुमारास वरोरा ते हिंगणघाट रेल्वेस्थानकादरम्यान कंबरेचा पट्टा सैल झाल्याने पिस्तूल पडून कुणीतरी ते घेऊन गेले असावे, असा संशय आहे. मात्र, पिस्तूलमध्ये १० राऊंड असल्याने त्याचा दुरुपयोग होण्याचीही भीती आहे. सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच याची सूचना लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक रवी वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी कोचमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाचे बयान नोंदविले. फिर्यादी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द पिस्तूल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :MLAआमदारrailwayरेल्वे