शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:31 IST

मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देमुलीची काढली छेड, जमावाकडून धुलाई : गिट्टीखदान पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडून एक पिस्तुल तसेच रोख आणि दागिन्यांसह घरफोडीचे साहित्य जप्त केले. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (वय २८) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. 

बुधवारी सकाळी गिट्टीखदानमधील पीडित मुलगी मॉर्निंग वॉक करीत असताना आरोपी नीलेश मागून आला. त्याने तिचे तोंड दाबून टी शर्ट ओढले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने प्रतिकार केल्याने तो पळून गेला. घरी जाऊन मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ती आरोपीला शोधण्यासाठी बाहेर पडली. तिला काही अंतरावर आरोपी नीलेश दिला. मुलीला पाहून आरोपी आपली अ‍ॅक्टीव्हा सोडून पळून गेला. मुलीने प्रसंगावधान राखत आरोपीची अ‍ॅक्टीव्हा आपल्या घरी नेली. त्यामुळे नीलेश तिच्या घरी पोहचला. त्याने मुलीसोबतच तिच्या आईशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी नीलेशला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपी नीलेशला अटक करून चौकशी केली असता तो मूळचा बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे आणि सध्या गोधनी मानकापूरच्या स्वामीनगरात राहात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या रूमची तपासणी केली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचे पिस्तुल, १० जिवंत काडतूस, ११, ३०० रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने आढळले. त्याच्यावर नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटकtheftचोरी