नगरसेवक नजरकैदेत अन् कुटुंबीय तडजोडीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:53 AM2021-11-28T10:53:45+5:302021-11-28T11:12:36+5:30

विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांवर नजर ठेवली जात आहे. याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. दगाफटका होऊ नये म्हणून पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

picnic for bjp corporators under surveillance | नगरसेवक नजरकैदेत अन् कुटुंबीय तडजोडीत?

नगरसेवक नजरकैदेत अन् कुटुंबीय तडजोडीत?

Next
ठळक मुद्दे विमानाचे बुकिंग फुल्लभाजप नगरसेवकांचा मोर्चा गोवा, कर्नाटककडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांवर नजर ठेवली जात आहे. याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. दगाफटका होऊ नये म्हणून पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय तडजोडीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपच्या नगरसेवकांना लेह, लडाख, काश्मीर, उटी यासह निसर्गरम्य पर्यटनस्थळी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र विमानांचे बुकिंग फुल्ल असल्याने या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. आता त्यांना गोवा, महाबळेश्वर, कर्नाटकच्या दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. पहिला जथ्था रविवारी निघणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली. दौऱ्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुरुष नगरसेवकांची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर व विजय झलके यांच्यावर तर महिला नगरसेविकांची जबाबदारी नगरसेविका वर्षा ठाकरे व नीता ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती आहे. नगरसेवकांना वेगवेगळ्या गटात पाठविण्याचे शनिवारी रात्री दौऱ्याचे नियोजन सुरू होते. नगरसेवकांची पहिली पसंती लेह, लडाखला असल्याचे सांगण्यात आले. काहींनी आजारामुळे व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे पर्यटनाला जाण्यास नकार दिला आहे. मात्र पक्षाचा आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

पर्यटनावर पाठवूनही दगाफटका

विधान परिषद निवडणुकीत गत काळातही नगरसेवकांना पर्यटनावर पाठविण्यात आले. परंतु त्यानंतरही दगाफटका झाल्याने उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. याचा विचार करता पर्यटनासोबतच खबरदारी घेतली जात आहे. ज्येष्ठ नगरसेवकांवर इतरांना सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पर्यटनाला निघण्यापूर्वीच नाराजी नाट्य

महिला नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबीयांना पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता कुटुंबीयांना सोबत नेण्याला नकार दिला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पक्षाचा आदेश असल्याने उघडपणे विरोधही करता येत नसल्याने नगरसेवकांच्या कुटुंबीयांची कोंडी झाली आहे. पर्यटनाला निघण्यापूर्वीच नाराजी नाट्य सुरू झाल्याने आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: picnic for bjp corporators under surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.