शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  एसएनडीएलच्या पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:15 IST

वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पाच लोकांना ताब्यातही घेतले.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी पोलिसांना करावा लागला बलप्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पाच लोकांना ताब्यातही घेतले.एसएनडीएलचे पथक बुधवारी दुपारी आझाद कॉलनीत पोहचले व मीटरची तपासणी सुरू केली. पथकात २५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी येथील नागरिकांनी पथकाला थांबविले व त्यांच्याकडे कारवाईची परवानगी आहे का, अशी विचारणा केली. पथकाने नागरिकांना कागदपत्र दाखविले व कारवाई सुरू ठेवली. दुपारी २ च्या सुमारासा काही लोक एकत्र आले व त्यांनी कारवाई थांबविण्यासाठी एकच गोंधळ घातला. एसएनडीएलचे कर्मचारी मीटर तपासण्याच्या नावावर त्यांच्या घरात शिरत आहेत, असा नागरिकांचा आरोप होता. दरम्यान, एका घरातील महिलेने आरडाओरड सुरू केली. हे पाहून वातावरण आणखी भडकले व काही लोकांनी एकाएक पथकावर दगडफेक सुरू केली. हे पाहून कर्मचाºयांनी धावपळ करीत मिळेल तेथे आडोसा शोधला. पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी हलका बलप्रयोग करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. पाच लोकांना ताब्यातही घेतले.व्यवस्थापक जखमी- एसएनडीएलचे व्यापार प्रमुख सोनल खुराना यांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेकीमध्ये कंपनीचे व्यवस्थापक भवानी प्रसाद चौबे यांच्या डोक्याला दगड लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वीजचोरीच्या विरोधात मोहीम सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.२८ ठिकाणी चोरी पकडली- दगडफेकीनंतरही एसएनडीएलच्या पथकाने परिसरात कारवाई सुरू ठेवली. या दरम्यानस २८ ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आली. एका ट्यूशन क्लासमध्ये सुमारे ११ केव्ही वीज चोरीचा पर्दाफाश झाला. कंपनी आता वीज चोरीचा हिशेब करीत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrimeगुन्हा