लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर 'ड्रग्ज इन्स्पेक्टर २०२५' भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना 'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्म डी) पदवीधारकांना पात्र नसल्याचे दाखवल्यामुळे 'फार्म डी' क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सहा वर्षांच्या वैद्यकीय शिक्षणाची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अपात्र ठरवणे, हे फक्त धक्कादायकच नाही, तर अन्यायकारक व नीतिविरुद्ध असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशन महाराष्ट्र आणि डॉक्टर ऑफ फार्मसी वेल्फेअर सोसायटी यांनी याला तीव्र विरोध दर्शवला असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक घायाळ यांनी सांगितले, २०१६ पासून सुरू झालेल्या संघर्षानंतर जानेवारी २०१८ मध्ये 'फार्म डी' पदवीधारकांना 'ड्रग इन्स्पेक्टर' पदासाठी पात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रात 'फार्म डी' ही 'डी फार्म', 'बी फार्म' आणि 'एम फार्म' इतकीच दर्जाची मान्यताप्राप्त पदवी असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, असे असतानाही 'एमपीएससी'कडून पुन्हा अपात्र ठरवणे म्हणजे शासकीय यंत्रणेची विस्मृतीच नव्हे, तर आमच्या व्यावसायिक अस्तित्वालाच झटका आहे.
'फार्म डी' ही ६ वर्षांची व्यावसायिक डॉक्टरेट पदवी आहे, ज्यामध्ये ५ वर्षांचे शैक्षणिक शिक्षण आणि १ वर्षाचा रुग्णालयीन इंटर्नशिप कालावधी असतो. यात क्लिनिकल फार्माकोलॉजी, औषध सुरक्षा निरीक्षण, विषयांचा समावेश असतो. जे 'ड्रग ड्रग कायदे यांसारख्या महत्त्वाच्या इन्स्पेक्टर'च्या कामाशी थेट संबंधित आहेत.
विद्याथ्यांमध्ये संभ्रम आणि संतापसध्या महाराष्ट्रभरातील शेकडो 'फार्म डी' पदवीधारकांनी अर्ज करताना अपात्रतेचा फटका बसल्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ६ वर्षे मेहनत करून अभ्यास केलाय आणि आता अचानक पात्र नाही, असं सांगितलं जातंय, हे मानसिकदृष्ट्याही त्रासदायक आहे, असे मत असोसिएशनचे डॉ. प्रतीक शिंदे यांनी व्यक्त केले.