शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दामिनी पथकाची एक लाखावर ठिकाणी पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:02 IST

महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हे शाखेच्या भरोसा सेल अंतर्गत कार्यरत दामिनी पथकाने गत दोन वर्षात १ लाख १० हजार ८११ ठिकाणी पेट्रोलिंग केली व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ४४६ सापळे रचले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आली.

ठळक मुद्दे४४६ सापळे रचले : २०१७ व २०१८ मधील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हे शाखेच्या भरोसा सेल अंतर्गत कार्यरत दामिनी पथकाने गत दोन वर्षात १ लाख १० हजार ८११ ठिकाणी पेट्रोलिंग केली व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ४४६ सापळे रचले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आली.या पथकाची १ जानेवारी २०१७ रोजी स्थापना करण्यात आली. शहरात परिमंडळनिहाय चार दामिनी पथके कार्यरत असून एका पथकामध्ये ४ महिला शिपाई व १ वाहनचालकाचा समावेश असतो. या पथकांनी २०१७ मध्ये ३८ हजार ३३० ठिकाणी पेट्रोलिंग केली व ६ सापळे रचले तर, २०१८ मध्ये ७२ हजार ४८१ ठिकाणी पेट्रोलिंग केली व ४४० सापळे रचले. यापैकी दोन सापळे यशस्वी ठरले. दरम्यान, या पथकाने बेलतरोडी येथे एक तर, अंबाझरी येथे ६ आरोपींविरुद्ध विनयभांगाचे गुन्हे दाखल केले. पुरुषांनी स्त्रियांना निर्जनस्थळी त्रास दिल्याची एकही तक्रार या दोन वर्षात पथकाकडे करण्यात आली नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी त्रास दिल्याच्या दोन तक्रारी करण्यात आल्या. छेडछाडीच्या तक्रारीही झाल्या नाहीत असे माहितीत नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी गुन्हे शाखेकडे अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिस