लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोलच्या किमतीत ५ आणि डिझेलच्या किमतीत २.५० रुपयांची दरकपात ऐकण्यास चांगले वाटते. जर गेल्या काही दिवसापूर्वीच्या किमतीवर नजर टाकल्यास नागपूर पेट्रोलच्या बाबतीत केवळ एक महिना सात दिवस मागे गेले आहे.५ आॅक्टोबरला शहरात पेट्रोलचे दर अंदाजे ८६.३१ रुपये होणार आहे. शहरात पेट्रोलचे हे दर जवळपास ३० आॅगस्टच्या दराएवढेच आहेत. तेव्हा शहरात पेट्रोल प्रति लिटर ८६.२८ रुपये होते. शुक्रवारी डिझेलचे अंदाजे प्रति लिटर दर ७८.७१ रुपये राहतील, ते ९ सप्टेंबरच्या (७८.६६) किमतीच्या जवळपास आहे. उल्लेखनीय असे की, ४ आॅक्टोबरला पेट्रोल ९१.९१ रुपये आणि डिझेल ८०.७१ रुपये प्रति लिटर होते.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यामध्ये अडीच-अडीच रुपयांची कपात केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणेचे स्वागत करीत राज्यात पेट्रोलवर वसूल करण्यात येणाऱ्या व्हॅटवर अडीच रुपये कपातीची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी कमी झाले. डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात न केल्यामुळे डिझेलवर केंद्र सरकारची केवळ प्रति लिटर अडीच रुपये कपात लागू राहील.
पेट्रोल ३० आॅगस्ट आणि डिझेल ९ सप्टेंबरच्या किमतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:56 IST
पेट्रोलच्या किमतीत ५ आणि डिझेलच्या किमतीत २.५० रुपयांची दरकपात ऐकण्यास चांगले वाटते. जर गेल्या काही दिवसापूर्वीच्या किमतीवर नजर टाकल्यास नागपूर पेट्रोलच्या बाबतीत केवळ एक महिना सात दिवस मागे गेले आहे.
पेट्रोल ३० आॅगस्ट आणि डिझेल ९ सप्टेंबरच्या किमतीवर
ठळक मुद्देदरकपातीचा मोठा फायदा नाहीराज्य सरकारची केवळ पेट्रोलवर दया