शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल मिळू शकेल ६७ रु. लिटर; विंडफॉल टॅक्सला तेल कंपन्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:43 IST

पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देशुद्धीकरणासाठी पेट्रोलपेक्षा जास्त खर्च येत असल्याने डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होऊ शकते. परंतु डिझेलवरील अधिभार रद्द करून किमती पेट्रोलपेक्षा कमी ठेवण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले.शुद्धीकरणासाठी पेट्रोलपेक्षा जास्त खर्च येत असल्याने डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होऊ शकते. परंतु डिझेलवरील अधिभार रद्द करून किमती पेट्रोलपेक्षा कमी ठेवण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.आज कच्च्या तेलाचे भाव २ डॉलरनी कमी होऊन ७८ डॉलर प्रति बॅरल आहेत. या भावाने एक लिटर पेट्रोल रिफायनरीला ३९.६० रुपयात पडेल. त्यावर २८ टक्के जीएसटी, २० टक्के सरचार्ज, ५ रुपये वाहतूक खर्च व ३.६० डिलर (पेट्रोल पंप मालकांचा) नफा आकारला तर पेट्रोल ग्राहकांना रु. ६७.२० मध्ये मिळू शकते. रिफायनरीला डिझेल ४१.५० मध्ये पडेल व त्यावर २८ टक्के जीएसटी, २० टक्के सरचार्ज, ५ रुपये वाहतूक खर्च व २.५० डिलर मार्जिन आकारून ग्राहकांना डिझेल ६८.९० मध्ये पडेल. पण डिझेलमुळे सर्वच उत्पादनांचा वाहतूक खर्च वाढतो व महागाई वाढते म्हणून सरकार डिझेलवरील सरचार्ज रद्द करू शकते. तसे झाले तर डिझेल ६० रुपये लिटर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.पेट्रोलियम उत्पादने सध्या जीएसटी कक्षेबाहेर आहेत. पण २९ पैकी २१ राज्यात भाजपची सत्ता आहे हे लक्षात घेता ती जीएसटीच्या कक्षेत आणणे सहज शक्य आहे. राज्य सरकारांना तसा ठराव करून जीएसटी कौन्सिलकडे पाठवावा लागेल. पेट्रोल/डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार विंडफॉल टॅक्स आणण्याचा विचार करत आहे. पण तिन्ही तेल कंपन्यांचा त्याला विरोध आहे.

पेट्रोलचा जीएसटीमध्ये दर१) रिफायनरी किंमत ३९.६०२) जीएसटी २८% ११.१०३) सरचार्ज २०% ७.९०४) वाहतूक खर्च ५.००५) डिलरचे मार्जिन ३.६०६७.२०अंदाजे किंमत - बदल संभव

डिझेलचा जीएसटीमध्ये दर१) रिफायनरी किंमत ४१.५०२) जीएसटी २८% ११.६०३) सरचार्ज २०% ८.३०४) वाहतूक खर्च ५.००५) डिलरचे मार्जिन २.५०६८.९०अंदाजे किंमत - बदल संभव

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल