शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात याचिका : खासगी कार्यालये, दारू दुकानांना मनाई करणाऱ्या अधिसूचनेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 21:00 IST

संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य दुकाने उघडण्यास मनाई करणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांनी अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य दुकाने उघडण्यास मनाई करणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित वादग्रस्त अधिसूचना जारी केली आहे. त्याविरुद्ध अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. कमल सतुजा, अ‍ॅड. मनोज साबळे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंढे यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून अधिसूचना काढली. ही अधिसूचना अवैध व आधारहीन आहे. त्यामुळे वादग्रस्त अधिसूचना रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य सर्व दुकाने सुरू करण्याची सशर्त मुभा देण्यात आली आहे. परंतु, महापालिका आयुक्तांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जाऊन ३ मे रोजी अधिसूचना जारी केली. दुकाने व प्रतिष्ठाने कायद्यांतर्गत नोंदणी नसलेली खासगी कार्यालये आणि दारूची दुकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांतर्गत येतात. त्यासंदर्भात निर्देश देण्याचे मनपा आयुक्तांना अधिकार नाहीत, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर