शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 20:12 IST

चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देशासनाला नोटीस : उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.मधुसूदन रुंगटा असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे चंद्रपुरातील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याचा आरोप केला आहे. दोन्ही कंपन्या शासकीय असूनही नियमानुसार कार्य करीत नाही. कोळसा खाणीतून सूक्ष्म कण व मिथेन, सल्फर डायआॅक्साईड, आॅक्साईड आॅफ नायट्रोजन हे धोकादायक वायू वातावरणात मिसळतात. पॉवर स्टेशनमधील फ्लाय अ‍ॅशमध्ये सल्फर डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस आॅक्साईड इत्यादी धोकादायक घटक असतात; परंतु केवळ ४५ टक्के फ्लाय अ‍ॅशचा उपयोग केला जातो. उर्वरित फ्लाय अ‍ॅश साठविली जाते. ती हवेने उडून वातावरणात मिसळते  असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत ऊर्जा व पर्यावरण विभागाचे सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी, केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाजनको, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन व वेकोलि यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरीश ठाकूर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpollutionप्रदूषण